मधुकर साखर कारखान्याची ४२ वर्षाची परंपरा यंदा खंडीत होणार !

मधुकर साखर कारखान्याची ४२ वर्षाची परंपरा यंदा खंडीत होणार !

फैजपूर : फैजपूर येथील"मधुकर"कारखान्याचा येत्या रविवारी दि 25 विजयादशमीच्या दिवशी यंदाच्या गळीत हंगामाचे बॉयलर पेटणार नसल्याने 42 वर्षांची परंपरा खंडित होणार आहे.त्यामुळे यंदाचा 2020-21 चा गळीत हंगामविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

फैजपूर येथील'मधुकर'कारखाना या भागाचा अर्थव्यवस्थेचा कणा व केंद्र बिंदु आहे उत्तर महाराष्ट्रात जळगांव जिल्ह्यात 42वर्षे अखंडपणे सुरू असल्याची परंपरा या कारखान्याने कायम ठेवली आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक घटकांना रोजगार मिळाला.मात्र चार-पाच वर्षे साखरेचे भाव घसरल्याने व उत्पादन खर्चापेक्षा साखरेला कमी भाव मिळत असल्याने त्यातच भर म्हणजे पावसाच्या कमतरते मुळे ऊसाची लागवड कमी प्रमाणात होत असल्याने 42 वर्षे अखंड पणे सुरू असलेला'मधुकर'कारखान्या समोर असलेल्या आर्थिक संकटामुळे प्रथमच 2019- 2020 बंद होता.यंदाही कारखान्यासमोर असलेली आर्थिक अडचण व उपलब्ध नसलेला पुरेसा ऊस यामुळे दरवर्षी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर होणारा 'मधुकर'चा बॉयलर अग्निप्रदीपन होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने विजयादशमीच्या दिवशी बॉयलर अग्निप्रदीपनची 42 वर्षांपासून ची परंपरा यंदाही खंडित होणार आहे.त्यामुळे चालू वर्ष 2020-21 चा गळीत हंगामविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.जिल्हा बँकेचे मधुकर साखर कारखान्या कडे असलेले 50/55 कोटी त्यामुळे कारखाना एनपीए मध्ये गेला आहे.सन 2018-19च्या गळीत हंगामात शेतकऱ्यांचे 16 कोटी, कामगारांचे 40 महिन्याचे पगार,ऊस तोडकऱ्याचे पेमेंट,वाहतूकदार ठेकेदार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी,शासकीय देणी, वीजबिल,पी एफ व ठेवी अशी देणी मोठ्या प्रमाणावर थकीत राहिल्याने कारखाना आर्थिक अडचणीत सापडला आहे.त्यामुळे शेतकरी,कामगार यासह या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या घटकांच्या हिताच्या दृष्टीने"मधूकरचे"आगामी काळात भवितव्य काय असेल याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

सालाबाद प्रमाणे दसराच्या दिवशी होणारा बॉयलर अंगिप्रदीपन या वर्षी सुध्दा होऊ शकणार नाही हे दुर्दैव आहे.कारखान्याने शेतकरी व कामगार, इतर देणी देण्यासाठी शासनाकडे सातत्याने आर्थिक मागणी केली होती.परंतु अध्यापही मिळू शकत नसल्याने यंदाचा सुध्दा गळीत हंगाम बंद राहणार आहे.
-- शरद महाजन,चेअरमन मसाका फैजपूर
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com