esakal | खडसेंच्या प्रवेशाने उत्‍तर महाराष्‍ट्रात नवीन परिणाम : अरूणभाई गुजराथी
sakal

बोलून बातमी शोधा

Arunbhai Gujarati

विजय पराजयाचे महत्‍त्‍व नाही. आपण काय कार्य करतोय हे महत्‍त्‍वाचे मानले जातेय. एकनाथराव खडसेंसारखे मोठे व्यक्‍तीमत्‍व राष्‍ट्रवादीत आल्‍याने जळगाव जिल्‍हाच नव्हे तर उत्‍तर महाराष्‍ट्रात राष्‍ट्रवादीला बळ मिळणार आहे.

खडसेंच्या प्रवेशाने उत्‍तर महाराष्‍ट्रात नवीन परिणाम : अरूणभाई गुजराथी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सर्वांना सोबत घेवून चालणारा नेता, कोणालाही नाराज न करणारे खंबीर नेतृत्‍व असलेले एकनाथराव खडसे राष्‍ट्रवादी कॉग्रेसमध्ये आल्‍याने पक्षाला निश्‍चितच बळकटी मिळणार आहे. एकनाथराव खडसे राष्‍ट्रवादीत आल्‍याने उत्‍तर महाराष्‍ट्रात येत्‍या काळात नवीन परिणाम पाहण्यास मिळतील; असे राष्‍ट्रवादीचे नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी मुंबई येथे म्‍हटले.
मुंबई येथील राष्‍ट्रवादी कार्यालयात सुरू असलेल्‍या एकनाथराव खडसे यांच्या प्रवेश सोहळ्यात ते बोलत हेाते. श्री. गुजराथी म्‍हणाले, की विजय पराजयाचे महत्‍त्‍व नाही. आपण काय कार्य करतोय हे महत्‍त्‍वाचे मानले जातेय. एकनाथराव खडसेंसारखे मोठे व्यक्‍तीमत्‍व राष्‍ट्रवादीत आल्‍याने जळगाव जिल्‍हाच नव्हे तर उत्‍तर महाराष्‍ट्रात राष्‍ट्रवादीला बळ मिळणार आहे. कारण जळगावसह धुळे, नंदुरबार जिल्‍ह्‍यात खडसेंना मानणारा एक वर्ग आहे. येणाऱ्या पुढील विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव जिल्‍ह्‍यात राष्‍ट्रवादीचे किमान पाच- सहा आमदार निवडून येण्याची ताकद खडसेंच्या रूपाने मिळाली आहे. यामुळे राष्‍ट्रवादी काँग्रेस जास्‍त बळकट करण्याचा निश्‍चय करण्याचे आवाहन त्‍यांनी उपस्‍थित कार्यकर्‍त्‍यांना केले.

loading image