जिल्ह्यात तपासण्या वाढल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ : गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

रुग्णाचे स्वॅब घेतल्यानंतर तो लॅबमध्ये पोचल्यानंतर 24 ते 34 तासाच्या आत रिपोर्ट दिला गेला पाहिजे यावर आमचा सध्या भर आहे. त्याप्रमाणे आमचे नियोजन आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कोविडवर उपाय योजनांकरण्यासाठी निधी दिला.

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाबाबत तपासणी मोहीम पंधरवडा राबविला जात आहे. यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहे. रुग्ण वाढीची संख्या पाहता येत्या पंधरा दिवसात जिल्हा कोवीड रुग्णालय (आताचे सिव्हिल) गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याचा विचार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

नक्‍की पहा - कोरोनाने त्यांचा मृत्यू...परिवार क्‍वारंटाईन आणि चोरट्यांनी मारला डल्ला 

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यावेळी उपस्थित होते. जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यापार्श्‍वभूमीवर लोकप्रतिनिधींची अभिप्राय, सूचना घेण्यासाठी आज जिल्हा नियोजन भवनात बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. 

36 तासांत अहवालावर भर 
पालकमंत्री पाटील म्हणाले, की रुग्णाचे स्वॅब घेतल्यानंतर तो लॅबमध्ये पोचल्यानंतर 24 ते 34 तासाच्या आत रिपोर्ट दिला गेला पाहिजे यावर आमचा सध्या भर आहे. त्याप्रमाणे आमचे नियोजन आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कोविडवर उपाय योजनांकरण्यासाठी निधी दिला. त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी रुग्ण वाहिकेची मागणी, पीपीई किट, इतर साहित्याची मागणी आहे. लवकरच त्या-त्या तालुक्‍याच्या ठिकाणी संबंधित साहित्य उपलब्ध होईल. 

जिल्हा कोवीड रुग्णालयात पॉझिटिव्ह 
रुग्णांची संख्या आगामी काळात वाढेल. याचा अंदाज घेऊन पंधरा दिवसांनी जिल्हा कोवीड रुग्णालयातील रुग्णांना डॉ.पाटील रुग्णालयात स्थलांतरित करू. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, केअर सेंटर, डेडीकेटेड केअर सेंटरमध्ये डॉक्‍टरांची नियुक्तीसाठी मागे जाहिरात दिली होती. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा डॉक्‍टरांची नियुक्तीसाठी प्रयत्न करू. मुलाखती घेऊन तात्काळ डॉक्‍टरांची नियुक्ती करू. 

हॉटेलमध्ये व्यवस्था 
ज्या रुग्णांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे आहेत, ज्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन राहण्याची इच्छा आहे. अशांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन राहण्याची परवानगी देवू. जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत अधिकारी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news gulabrao patil jalgaon district corona testing Increase and positive case up