कोरोनाने त्यांचा मृत्यू...परिवार क्‍वारंटाईन आणि चोरट्यांनी मारला डल्ला 

robary
robary

भुसावळ  : शहरात दुसऱ्यांदा कोरोना पाँझिटिव्ह रूग्णाच्या घरी धाडसी चोरी झाल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. तर नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. लोखो रुपयांची रोकड व दागिने चोरट्यांनी शनिवारी (ता. २७) रात्रीच्या सुमारास लंपास केल्याची घटना घडली आहे.

शहरातील प्रसिद्ध मटण हाँटेलचे संचालक यांचे कोरोना संसर्गामुळे दोन दिवसापुर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या परीवाराला क्वांरटाईन केल्याने घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी शनिवारी (ता. २८) रात्रीच्या सुमारास लोखोंची रोकड व दागदागिने लंपास केल्याची घटना शहरातील सपना नगर भागात घडली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असुन नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे . घटना समजताच पोलिसांनी डॉग स्काटसह घटनास्थळी धाव घेतली. 
 यापूर्वी देखील खडका रोडवरील कोरोना  पाँझिटिव्ह डॉक्टरांच्या घरातुन 15 लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती. शहरात मागच्या आठ दिवसापुर्वी तीन गावठी पिस्टल व तलवार पोलिसांनी हस्तगत केली आहे. कोरोनाच्या पाश्वभुमिवर पोलीस बंदोबस्तात व्यस्त असल्याची संधी साधत चोरटे बंद घरांना टारगेट करीत आहे. शहरात दुसऱ्यांदा धाडसी चोरी झाल्याने पोलीसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे नेमकी किती रोकड व दागिने लंपास केले ते समजु शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com