‘सीबीएसई’ बारावीत मुलींची बाजी…अनेक शाळांचा निकाल शंभर टक्के !

अमोल महाजन
मंगळवार, 14 जुलै 2020

यंदा मुलांनी बाजी मारली. या निकालाबाबत मोठी उत्सुकता होती. सीबीएसई बारावीच्या निकालात काही वर्षांपासून मुलीच अव्वल आहेत. 

जळगाव: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल सोमवारी (ता. १३) जाहीर झाला. यंदा मुलांनी बाजी मारली. या निकालाबाबत मोठी उत्सुकता होती. सीबीएसई बारावीच्या निकालात काही वर्षांपासून मुलीच अव्वल आहेत. 
जळगावातील केसीई सोसायटी संचालित ओरियन सीबीएसई इंग्लिश स्कूलने यंदाही निकालाची परंपरा कायम ठेवली. बारावीच्या परीक्षेत भार्गव गुरव ९५.०४ टक्के गुण मिळवून प्रथम मिळविला. श्याम जाखेटे (९५) द्वितीय आला. विद्यार्थिनी नेहा पाटील (१.०२) तृतीय आली. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी अभिनंदन केले. प्राचार्या सुषमा कंची व उपप्राचार्या माधवीलता सित्रा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

पाचोऱ्यात साक्षी येवले अव्वल 
पाचोरा : येथील निर्मल सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राहिली. मार्चमध्ये झालेल्या सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश मिळवले. साक्षी येवले (९१.६०) प्रथम, हर्ष राजपूत (६३.८०) द्वितीय, तर कुमार देशमुख (६३.७०) तृतीय आला. संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सूर्यवंशी, सचिव ॲड. नरेंद्रसिंग सूर्यवंशी, शालेय शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, प्राचार्या मंजू शर्मा, उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, गणेश राजपूत, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 
 
‘रुस्तमजी’त गरीमा प्रथम 
जळगाव शहरातील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी गरिमा जैन हिने ९५.४ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला तर द्वितीय ईशा चौधरी ९५.२ टक्के तर श्रीनिधी तेली हिने ९४.४ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. शाळेतील ३० विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यापैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच परीक्षेत चिराग अग्रवाल (९४), हर्षिता अग्रवाल (९२.८), गौरी ढवळे (९१.८), प्रीती वाघ (९१.६), समय सोंजे (९१.६) टक्के गुण मिळवत विद्यार्थ्यांनी यश मिळविले. गुणवंत विद्यार्थ्यांचे स्कूलतर्फे कौतुक करण्यात येत आहे. 

 सेंट जोसेफ स्कूल 
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेतील किमया हर्षल चौधरी ही ९५.६ टक्के गुण मिळवून प्रथम आली. आदर्श सतीश ओसवाल ९४.६ टक्के गुण मिळवून द्वितीय तर सारंग सचिन मंडोरे ९४.२ टक्के गुण मिळवून तृतीय आला.

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ‘CBSE’ Twelfth Girls Bet many Schools Result One Hundred Percent!