राज्यात १६४ अभियांत्रिकी सहाय्यक आता अभियंता! 

देविदास वाणी
Monday, 7 September 2020

लॉकडाउनच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रखडलेले पदोन्नतीचे आदेश अखेर नुकतेच जलसंपदा विभागाने जारी केले आहेत. यामुळे आनंद झाला झाला आहे. अनेक वर्षांपासून अर्हताप्राप्त असतानाही संघटनेला लढा द्यावा लागत होता.

जळगाव : राज्यातील जलसंपदा विभागातील १६४ अभियांत्रिकी सहाय्यकांना राज्य शासनाने कनिष्ठ अभियंतापदी पदोन्नती दिली आहे. लॉकडाउनच्या परिस्थितीत रखडलेले पदोन्नतीचे आदेश नुकतेच शासनाने काढले आहेत. या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी संघटना लढा देत होती, अशी माहिती जिल्हाध्यक्ष एच. एच.चव्हाण, सचिव व्ही. आर. पाटील यांनी दिली. 

जळगाव, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोकण, अमरावती या विभागांत या अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. जळगाव विभागात रवींद्र चौधरी (नाशिक), हिरामण चव्हाण (नाशिक), त्र्यंबक पाटील (नाशिक), बिजलाल राजपूत (नाशिक) यांना जळगावच्या मुख्य तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात पदेान्नती देण्यात आली आहे, तर जनार्दन वारके (नाशिक) यांना उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक कार्यालयात मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती मिळाली. यासह राज्यातील १६४ अभियांत्रिकी सहाय्यकांना पदोन्नती मिळाली आहे. 
 
लॉकडाउनच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रखडलेले पदोन्नतीचे आदेश अखेर नुकतेच जलसंपदा विभागाने जारी केले आहेत. यामुळे आनंद झाला झाला आहे. अनेक वर्षांपासून अर्हताप्राप्त असतानाही संघटनेला लढा द्यावा लागत होता. या पदोन्नत्यांमुळे कुशल अनुभवाचा लाभ जलसंपदा विभागास होणार आहे. १६४ अभियांत्रिकी सहाय्यकांना कनिष्ठ अभियंतापदी पदोन्नतीचे आदेश मागणी केलेल्या महसुली विभागात देण्यात आले आहेत. 
- एच. एच. चव्हाण, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी संघटना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon 164 engineering assistant posting engineer on state