खानदेशासह गुजरातमध्ये ७०० ठिकाणी आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 August 2020

किसानमुक्ती दिनी शेतकऱ्यांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध व त्यांच्या मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जळगाव, धुळे, नंदूरबार, बुलढाणा, गुजरात राज्यातील सुरत, नर्मदा, तापी, भरोच येथील ७०० ते ८०० गावांमध्ये किसान मुक्ती आंदोलन करण्यात आले.

जळगाव : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे जळगाव, धुळे, नंदुरबारसह गुजरात राज्यात ७०० गावांमध्ये किसान मुक्ती आंदोलन करण्यात आले. यात आदिवासी बांधवासोबतच मोर्चाची युवा टीमही सहभागी झाली होती. ‘आमू आखा एक छे...आमू आखा एक छे…, लढेगें...जितेंगे..’ आदी घोषणांनी परिसर दणाणला होता. 

किसानमुक्ती दिनी शेतकऱ्यांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध व त्यांच्या मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जळगाव, धुळे, नंदूरबार, बुलढाणा, गुजरात राज्यातील सुरत, नर्मदा, तापी, भरोच येथील ७०० ते ८०० गावांमध्ये किसान मुक्ती आंदोलन करण्यात आले. देशभरात या दिवशी विविध संघटना या कोरोना संसगार्मुळे नागरिकांनी आपापल्या गावात निदर्शने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या ९ मागण्यांचे पत्र पाठविले. संबंधित ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिले. 

जळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, अशोक पवार, विनोद देशमुख, मुकुंद नन्नवरे, भरत बारेला, केशव वाघ, चंद्रकांत चौधरी, धर्मा बारेला, ताराचंद बारेला, प्रकाश बारेला, भारती गाला, संदीप घोरपडे, पन्नालाल मावळे, अतुल गायकवाड, महेंद्र गायकवाड, सोमनाथ माळी, इरफान तडवी आदी उपस्थित होते. यावेळी आदिवासी शेतकरी पारंपरिक वाद्यांच्या गजरात, पारंपरिक वेषभूषेत गोल रिंगण करीत निदर्शने केली. निदर्शने पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 
जळगाव जिल्ह्यातील -यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, बोदवड,भुसावळ, चाळीसगाव व जळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा ,अक्कलकुवा व धडगाव तालुक्यामधील शेकडो गावांमध्ये लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने सहभाग घेतला. 
शासनाने आतातरी शेती कडे गांभीर्याने बघून शेतकऱ्याला त्याच्या समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढावे आणि या देशाची अर्थव्यवस्था हि शेतीशिवाय अपूर्ण असून खऱ्या अर्थाने राष्ट्र म्हणून आर्थिक महासत्ता म्हणून प्रगती करायची असेल तर शेतकरी हा त्यातील एक महत्वाचा घटक आहे हे विसरू नये किसान मुक्ती आंदोलनाची दखल शासनाने घ्यावी अन्यथा हे शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा यावेळी देण्यात आला. 

या मागण्यांसाठी झाले आंदोलन.. 
त्वरित कर्जमुक्ती करा शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या, शेतकरी व आदिवासींच्या विरोधातील काढलेले अध्यादेश तात्काळ मागे घ्या, शेतकऱ्याचे वीजबिल माफ करत वीज सुधारणा बिल २०२० मागे घ्या, डीझेल च्या किंमती कमी करा, कोरोना काळात शेतकरी व कष्टकरी वर्गाला पूर्ण रेशन द्या, दुधाला हमीभाव वाढवून द्या,आदिवासींना त्यांनी दाखल केलेले दावे त्वरित निकाली काढून त्यांना शेतीचा अधिकार द्या आदी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon aadivashi din khandesh and gujrat sevan hundred strike