रात्री ‘काढा’ प्या, सकाळी कफ मोकळा; दहा हजार जणांना मोफत वाटप 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जुलै 2020

कोरोनावर मात करण्यासाठी काढा तयार करण्याची कल्पना सुचली. त्यांनी त्यासाठी लागणारे सर्व साहित्य केले. त्यांचा एकत्रित मसाला तयार करून त्यांच्या लहान पुड्या बनविला.

जळगाव : कोरोना संसर्गाचे संकट जगभरात आहे. प्रत्येक जण कोरोना होऊ न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. काहीजण इतरांना कोरोना होणार नाही याची दक्षता घेत विविध प्रकारचे साहित्य मोफत वाटप करताहेत. भुसावळचे साईसेवक, नगरसेवक पिंटू कोठारी यांनी चक्क कोरोना बरा होण्याचा काढाच मोफत वाटला आहे. गेल्या पंधरा दिवसात चक्क दहा हजार जणांना काढा मोफत वाटला आहे. यात परिसरातील नागरिक, नगरसेवक, आमदार, पोलिस, सामाजिक कार्यकर्ते आदींचा समावेश आहे. 

भुसावळ येथील कोठारींना कोरोनावर मात करण्यासाठी काढा तयार करण्याची कल्पना सुचली. त्यांनी त्यासाठी लागणारे सर्व साहित्य केले. त्यांचा एकत्रित मसाला तयार करून त्यांच्या लहान पुड्या बनविला. जे नागरिक आजारी होते किंवा ज्यांना सर्दी, खोकला लक्षण आहेत अशांना दिला. त्यांनी तो काढला घेताच. त्यांना फरक आढळला. रुग्णांचा कफ बाहेर पडू लागला. सर्दी बंद झाली. इतर आजाराचा त्रासही कमी झाला. यामुळे श्री. कोठारी यांच्याकडे काढ्याची मागणी वाढली. श्री.कोठारी यांनी त्यांच्या परिसरातील सर्वांना काढा मोफत दिला. अनेक पोलिसही श्री.कोठारींचे मित्र आहे. कोरोना काळात पोलिसांनाही काढा मोफत दिल्याने त्यांची इम्यूनिटी पावर वाढली. काही पोलिसांचे घेतलेले स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. 

असा घ्या काढा.. 
काढ्याची एक पुडी असते. पुडीतील एक चमचा पावडर ५ कप पाण्यात टाकावी. थोडी हळद, एक चमकचा गुळ टाकून पंधरा मिनीटे पाणी उकळू द्यावे. काढा पिण्यास तयार होईल. रात्री काढा पिल्यास सकाळी शरीरातील कफ बाहेर पडतो. काढा पिल्याने कोरोना होणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon aayurvedik kadha corona peitants and cuff problem solw