esakal | विद्यार्थी मारहाणीच्या निषेधार्थ महापौरांनी काळी फित लावून केले कामकाज !
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी मारहाणीच्या निषेधार्थ महापौरांनी काळी फित लावून केले कामकाज !

कोरोनामुळे गेल्या ५ महिन्यापासून विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यातच कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती देखील नाजूक आहे. आपल्या मागण्या शासनाकडे पोहचविण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न हा त्यांचा हक्क होता.

विद्यार्थी मारहाणीच्या निषेधार्थ महापौरांनी काळी फित लावून केले कामकाज !

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव :  विद्यार्थ्यांच्या  शैक्षणिक वर्षाच्या विविध मांगणयासाठी धुळे येथे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या भेटीसाठी जमलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी एखाद्या गुंडाप्रमाणे मारहाण केली. आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे भवितव्य आहेत. विद्यार्थ्यांना झालेली मारहाण निषेधार्थ जळगाव महापालिकेचे महापौर भारती सोनवणे काळी फित लावून महापालिकेचे कामकाज केले.

धुळे येथे बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महापौर भारती सोनवणे यांनी काळी फित लावून गुरुवारी महापालिकेत कामकाज केले. महापौर म्हणाल्या की, विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. कोरोनामुळे गेल्या ५ महिन्यापासून विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यातच कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती देखील नाजूक आहे. आपल्या मागण्या शासनाकडे पोहचविण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न हा त्यांचा हक्क होता.

पोलिसांची अमानुष मारहाण

अभाविपच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या मागण्या मांडणार होते. परंतु पोलिसांनी त्यांना पकडून एखाद्या गुंडाप्रमाणे मारहाण केली.  धुळ्यात झालेल्या या सर्व प्रकाराचा मी निषेध करते, असे महापौरांनी मत व्यांयक्नीत केले. 

loading image