esakal | सव्वा लाखांच्या लाचप्रकरणी जळगाव प्रांत जाळ्यात !
sakal

बोलून बातमी शोधा

सव्वा लाखांच्या लाचप्रकरणी जळगाव प्रांत जाळ्यात !

जिल्ह्यातील वाळू वाहतुकीचा परवाना असताना जळगाव जिल्ह्यात वाळू वाहतूक केल्याप्रकरणी या राजकीय पदाधिकारी असलेल्या व्यावसायिकाचे दोन डंपर जप्त करुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले होते.

सव्वा लाखांच्या लाचप्रकरणी जळगाव प्रांत जाळ्यात !

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव  : बुलडाणा जिल्ह्यातील परवाना असताना अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी जप्त दोन डंपर सोडण्यासाठी दोन लाखांच्या लाचेची मागणी करत सव्वा लाख रुपये स्वीकारल्याप्रकरणी जळगाव प्रांताधिकाऱ्यांसह लिपिक अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रांत कार्यालयात आज दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईने महसूल वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक व त्यासंबंधी कारवाईचा विषय गाजत होता. महसूलच्या अधिकाऱ्यांविरोधात अशा प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारीही समोर येत होत्या. प्रत्यक्षात तक्रारदार व त्याबाबतची कारवाई होत नव्हती. या प्रकरणांमधूनच माहिती अधिकार कार्यकर्ता व तहसीलदार यांच्यातील वादही जगजाहीर झाला. 

दोन लाखांची मागणी 
या वादाचे प्रकरण ताजे असताना आज वाळू व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन थेट जळगाव उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे यांच्यावरच ‘ट्रॅप’ करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातील वाळू वाहतुकीचा परवाना असताना जळगाव जिल्ह्यात वाळू वाहतूक केल्याप्रकरणी या राजकीय पदाधिकारी असलेल्या व्यावसायिकाचे दोन डंपर जप्त करुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले होते. ते सोडविण्याच्या मोबदल्यात या व्यावसायिकाकडून दीपमाला चौरे यांच्यासमोर त्यांच्याच कार्यालयातील लिपिक अतुल अरुण सानप यांनी २ लाखांची मागणी केली. 

असा रचला ट्रॅप 
गुरुवारी रकमेची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती १ लाख २५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार ही रक्कम आज दुपारी प्रांत कार्यालयातच देण्याचेही ठरविण्यात आले. यादरम्यान संबंधित वाळू व्यावसायिक तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करत याबाबत लेखी तक्रार दिली. विभागाचे पोलिस उपअधीक्षक जी.एम. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग बच्छाव व सहकारी अशोक अहिरे, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्‍वर धनगर आदींनी सापळा रचला. ठरल्या वेळेनुसार तक्रारदार सव्वा लाखांची रोकड घेऊन गेला असता सानप यांच्या खासगी पंटरने ही रक्कम स्वीकारली. त्यावरुन दीपमाला चौरे व सानप यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top