दुर्दैवी घटना: माहेरी निघालेल्या मायलेकास गॅस टँकरने चिरडले

Jalgaon Accident : खाली पडताच टँकरचे चाक दोन्ही मायलेकांवरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू ओढवला.
Accident
Accident
Updated on


जळगाव : बांभोरी (ता. जळगाव) गिरणा पुलावर सुसाट गॅस टँकरच्या (Gas tanker) मागील चाकात आल्याने आईसह मुलाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना सोमवारी (ता. २७) दुपारी साडेचारला घडली. या भीषण अपघातात (Accident) चारुशीला राहुल पाटील, मुलगा निशांत अशा मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अपघातग्रस्त स्कूटीचालक रूपाली पाटील जखमी झाल्या आहेत. एरंडोल येथून दुचाकीने जळगावी (मुक्ताईनगरात) माहेरी येण्यासाठी त्या निघाल्या होत्या. थोड्या अंतरावरच आईचे घर असताना काळाने माय-लेकावर झडप घातली.

Accident
विहिरीवर वीज पडून महिलेचा मृत्यू, तीन बालके थोडक्यात बचावले


एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात चारुशीला राहुल पाटील (वय ४०) पती राहुल व मुलगा निशांत (१२) यांच्यासह वास्तव्यास आहेत. त्यांची मोठी बहीण रूपाली पाटील एरंडोल येथील एका इंग्रजी शाळेत शिक्षिका असून, त्या जळगावात (मुक्ताईनगर) एसएमआयडी महाविद्यालय परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्यासोबत वडील लीलाधर पाटील व आई राहतात. त्या रोजच जळगाव ते एरंडोल दुचाकीने प्रवास करतात. सोमवारी बहीण चारुशीला व भाचा निशांत यांना घेऊन रूपाली पाटील दुचाकी (एमएच १९, डीक्यू ३८९६)वरून एरंडोलहून जळगावला येण्यासाठी दुपारी चारला निघाल्या. पाळधीनंतर बांभोरी गावाजवळ गिरणा नदीवरील पुलावरून जाताना पुलावरील खड्ड्यांमुळे चालक रूपाली यांचा तोल जाऊन दुचाकीवरील चारुशीला व निशांत असे दोघेही शेजारी चालत असलेल्या सुसाट गॅस टँकच्या दिशेने, तर रूपाली दुसऱ्या बाजूने खाली फेकल्या गेल्या. खाली पडताच टँकरचे चाक दोन्ही मायलेकांवरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू ओढवला, तर रूपाली यांच्या डोक्याला, कंबरेवर दुखापत झाली.


जखमी अवस्थेतही आर्जव
रूपाली पाटील यादेखील अपघातात जखमी झाल्या, तशाच अवस्थेत त्यांनी बहीण व भाचा निशांतला पाहताच एकच आक्रोश करत मदतीला याचना केली. अपघात होताच वाहने जागच्या जागीच थांबली. इतर वाहनधारकांनी मदतीला धाव घेतली. होत्या त्या अवस्थेत चारुशीला व निशांतला घेऊन जिल्‍हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करताच रूपाली यांना भोवळ आली. पत्नीसह मुलाचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने रुग्णालयात आलेल्या चारुशीला यांचे पती राहुल पाटील यांना जबर धक्का बसला होता.

Accident
Jalgaon : ‘गुलाब’ चक्रीवादळाने जळगाव जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’


दीड तास वाहतूक ठप्प
अपघातात मायलेकाचा मृत्यू ओढावल्याने वाहने जागच्या जागीच थांबली, दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प होऊन पाळधी दूरक्षेत्राचे सहाय्यक निरीक्षक गणेश बुवा सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोचले, तर तालुका पोलिसांनीही धाव घेतली. जखमींना रवाना केल्यावर दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन तास लागले. दोन्ही बाजूने पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या हेात्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com