खडसेंचा प्रवेश आणि जिल्ह्यात कार्यकर्त्याचा जल्लोष !

भूषण श्रीखंडे
Friday, 23 October 2020

खडसे यांचा प्रवेश झाल्यानंतर खडसे यांचे गाव मुक्ताईनगर, कोथडी तसेच जळगाव शहर, पहुर आदी जिल्ह्यातील गावांमध्ये जल्लोष केला.

जळगाव ः एकनाथराव खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये शरचंद्रजी पवार यांच्या हस्ते प्रवेश केला. आणि जळगाव जिल्ह्यात काँग्रेस तसेच खडसेसमर्थकांनी एकच जल्लोष केला. 

मुंबई येथे राष्ट्रवादी च्या पक्ष कार्यालयात आज एकनाथराव खडसेंचा पक्षप्रवेश सोहळा दुपारी पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरचंद्र पवार यांच्या हस्ते खडसे यांच्यासह पत्नी मंदाताई खडसे, मुलगी रोहीण खडसे-खेवलकर, माजी आमदार गुरूमुख जगवाणी आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. खडसे यांचा प्रवेश झाल्यानंतर खडसे यांचे गाव मुक्ताईनगर, कोथडी तसेच जळगाव शहर, पहुर आदी जिल्ह्यातील गावांमध्ये जल्लोष केला. तर अनेक ठिकाणी साखर, पेढे वाटून आनंद साजरा केला. 

मुक्ताईनगरात कार्यकर्त्यांचा जल्लोष 
मुक्ताईनगर हा खडसेंचा मतदार संघ असून आज मुक्ताईनगरात खडसेंचे सर्व समर्थक राष्ट्रवादीचा हातात झेंडा घेतल्याचे दिसत होते. तसेच फटाके फोडून देखील जल्लोष खडसेंचे गाव असलेले कोथडी येथे, मुक्ताईनगरातील परविर्तन चौक, बस स्थानक, महाराणा प्रताप चौक येथे जल्लोष केला जात होता.

आमदारांच्या घरासमोर फटाके फोडल्याने वाद
मुक्ताईनगराचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या घराबाहेर खडसे समर्थकांनी फटाके फोडल्याने काही वेळासाठी तणााव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ येवून कार्यकर्त्यांना समजावून फटाके फोडणाऱतर दोन कार्यकर्त्यांना पोलीसांनी या प्रकरणी अटक केली आहे. 

जळगाव शहरात कार्यकर्त्यांचा उत्साह
जळगाव शहरात देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी आज खडसे यांच्या प्रवेश केल्याने जल्लोष केला. यावेळी शहरात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच पेढे वाटून आनंद साजरा केला. तसे जळगाव येथील खडसेंच्या निवास्थानी देखील समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला. 

पहुरला जल्लोष
पहूर येथे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानिमित्त आनंदोत्सव साजर केला. पहूरकरांनी दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होत असतांना दिसली. खडसेंचे समर्थकांनी बॅनर,राष्ट्रवादीचे झेंडे, फटाके फोडून जल्लोष केला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा , युवक अध्यक्ष शैलेश पाटील , सुकलाल बारी यांनी मनोगत व्यक्त केले . ज्येष्ठ शिवसैनिक शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी साखर वाटली .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon activists in Jalgaon district rallied after Eknathrao Khadse joined NCP