पीक पाहणी आता होणार मोबाइल अॅपवर!

१४ ऑगस्टपर्यंत ई-पीक पाहणी डेमो अॅप उपलब्ध करून देण्यात येत आहे. १५ ऑगस्टपासून ई-पीक पाहणी अॅप उपलब्ध होणार आहे.
Mobile app
Mobile app


जळगाव : जिल्ह्यात पीक पेरणीची (Crop Sowing) माहिती मोबाइलवरील अॅपद्वारे (Mobile app) गाव नमुना क्रमांक १२ मध्ये नोंदवण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांना (Farmers) उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात ई-पीक पाहणी कार्यक्रम सुरू झाला आहे. आता तलाठ्यांऐवजी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाइल अॅप डाऊनलोड करून खातेदार म्हणून नोंदणी करता येईल.

Mobile app
बीएचआर प्रकरणःझंवर नेटवर्किंगमध्ये रिक्षाचालकही भरायचा ई-निविदा


१४ ऑगस्टपर्यंत ई-पीक पाहणी डेमो अॅप उपलब्ध करून देण्यात येत आहे. १५ ऑगस्टपासून ई-पीक पाहणी अॅप उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रकल्पाचे समनव्यक, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे तलाठी, कृषी सहायक यांना पीक पाहणी अॅपबाबत प्रशिक्षण देण्यात आले. शेतकऱ्यांना हे अॅप डाऊनलोड करून पीक पाहणीचा डेमो देता येईल.



फार्मर फ्रेंडली ॲप
पीक पेरणी अहवालाचा रिअल टाइम क्रॉप डाटा संकलित होण्यासाठी पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेण्यात येत आहे. पीक पेरणीबाबतची माहिती अॅपद्वारे गाव नमुना क्रमांक १२ मध्ये नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: उपलब्ध करून देण्यासाठी ‘फार्मर फ्रेंडली अॅप’ टाटा ट्रस्टने आज्ञावली विकसित केली आहे. या आज्ञावलीचा वापर करून तांत्रिक, अनुषंगीक बाबींच्या सहाय्याने १५ ऑगस्टपासून राज्यात राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे या प्रकल्पाचे समन्वयक आहेत. १ ऑगस्टपासून ई-पीक पाहणी डेमो अॅप उपलब्ध करून देण्यात येत आहे. क्यूआर कोडच्या सहाय्याने हे डेमो अॅप वापरण्यात येत आहे. १४ ऑगस्टपर्यंत हे अॅप उपलब्ध राहील.

Mobile app
पुनर्रचित हवामानाच्या आधारावर शेतकऱ्यांना मदत मिळावी-खासदार पाटील


प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे तलाठी, कृषी सहायक यांना पीक पाहणी अॅपबाबत प्रशिक्षण देण्यात आले. शेतकऱ्यांना हे अॅप डाऊनलोड करून पीक पाहणीचा डेमो देता येईल. १५ ऑगस्टपासून ई-पीक पाहणी अॅप उपलब्ध होणार आहे. हे अॅप डाऊनलोड करून शेतकऱ्यांना त्यांची वैयक्तिक माहिती भरून खातेदार म्हणून नोंदणी करता येईल. मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक भरून पीक पेरणीची माहिती भरता येईल. त्यानंतर पिकांचा फोटो अपलोड करावा लागेल. त्यावर शेतात पेरलेल्या सर्व पिकांची नोंदणी करणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com