कृउबातील गर्दी नियंत्रणासाठी पोलीस अधिक्षकांनी हाती घेतले सुत्र!

भाजीपाला बाजार सकाळच्या सत्रात आणि कांदा-बटाटाचा बाजार दुपारच्या सत्रात भरविला जाणार आहे.
Agricultural Produce Market
Agricultural Produce Market Agricultural Produce Market

जळगाव ः जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) मध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना संसर्ग (Corona infection) वाढण्याचा धोका होता. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार होती. त्यानुसार आज पोलिस अधिक्षकांनी (Superintendent Police) थेट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी जावून पाहणी केली. आणि गर्दी नियंत्रणासाठी बुधवार पासून कडक अमलंबजावणी केली जाणार असून टोकन पद्धतीने आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तर तिन चाकी गाड्यांना प्रवेश बंदी व दोन टप्यात बाजाराचे आता विभाजन (Market segmentation) केले आहे.

(agricultural produce market superintendent police takes action control crowd)

Agricultural Produce Market
दिलासादायक..जळगाव जिल्ह्यात तीव्र उन्हाळ्यातही केवळ एकच टँकर

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहाटे मोठ्या प्रमाणात फळ, भाजीपाला, कांदे, बटाटे असा तीन बाजार एकाच वेळी भरत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना संसर्ग अधिक पसरण्याची भिती निर्माण झाली होती. या गर्दी बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी, व्यापारी असोसिएसनचे पदाधिकारी, पोलिस अधिकारी, मनपा अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती. त्यानुसार आज बाजारातील गर्दी नियंत्रणासाठी उपायोजनांचा आढावा घेण्यासाठी पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पहाटेच बाजार समितमध्ये पाहणी केली. यावेळी महापालालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे अतिक्रमण निमृर्लन पथकासह उपस्थित होते.

फळ बाजार दुसरीकडे हलवला

बाजार समितीमध्ये एकाच वेळी तीन बाजार भरत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्यामुळे कोरोना संसर्ग आजार पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. त्यानुसार फळ बाजार दुसरीकडे हलविण्यात आला आहे. तर भाजीपाला बाजार सकाळच्या सत्रात आणि कांदा-बटाटाचा बाजार दुपारच्या सत्रात भरविला जाणार आहे.

Agricultural Produce Market
जळगाव शहरात लशींचा तुटवडा, लसीकरण पुन्हा ठप्प !

टोकन असल्यावरच प्रवेश

बाजार समितीमध्ये बुधवार पासून गर्दी नियंत्रणासाठी तसेच कोरोना बाबत कठोर पावले उचले जाणार आहे. त्यासाठी बाजार समितीमध्ये ज्यांच्या जवळ टोकन आहे त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तर तिन चाकी वाहनांना प्रवेश बंद केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com