esakal | जळगाव शहरात लशींचा तुटवडा, लसीकरण पुन्हा ठप्प !
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव शहरात लशींचा तुटवडा, लसीकरण पुन्हा ठप्प !

जळगाव शहरात लशींचा तुटवडा, लसीकरण पुन्हा ठप्प !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवाजळगाव ः जिल्ह्यातील लशींचा (vaccin) पुरवठा न झाल्याने सोमवारी (ता. १०) पुन्हा शहरातील लसीकरण केंद्रे ((vaccination center) लशींअभावी बंद होती. अनेक नागरिकांना (citizen) सोमवारी सकाळीच हजर राहूनही लस न घेताच परतावे लागले. त्यामुळे मंगळवार (ता. ११)पासून सुरू होणारी नवीन चार केंद्रे लशींअभावी सुरू होतील का, असा प्रश्‍न आहे.


( jalgaon city corona vaccines shortage vaccines stopped)

हेही वाचा: जिल्हा संचार बंदी तरी..लसीकरणासाठी सीमा उल्लंघन !

शहरात रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, शाहू महाराज हॉस्पिटल, शिवाजीनगरातील रुग्णालयात लसीकरण सुरू होते. सोमवारी मात्र सर्वच केंद्रावरील लशी संपल्याने लसीकरण केंद्रावर फलक लावण्यात आले होत. शाहू महाराज, शिवाजीनगरातील केंद्र सकाळी काही तासच सुरू होते. नंतर तेही बंद झाले.

सात हजार लशींचे डोस
कोव्हिशील्डचे सात हजार, तर कोव्हॅक्सिनचे अडीच हजार डोस जिल्ह्यात सायंकाळी येतील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. ते डोस सकाळीच संबंधित केंद्रांवर पोचविले जातील. त्यामुळे उद्या लसीकरण केंद्र सुरू राहतील.

आजपासून नवीन लसीकरण केंद्रे
शहरात लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी पाहता मंगळवार (ता. ११)पासून चार नवीन लसीकरण केंद्रे शहरात सुरू करण्यात येणार आहे. सर्वच केंद्रांवर फक्त कोव्हिशील्ड लसी देण्यात येतील. कोव्हॅक्सिनचा साठा संपल्याने त्याची मागणी करण्यात आली आहे. उपलब्ध झाल्यानंतर त्याही लसी देण्यात येतील.

हेही वाचा: जळगावला दिलासा..महिन्याभरात प्रथमच १५च्या आत मृत्यु !

वयोगटानुसार केंद्रे
शहरातील नागरिकांसाठी चार नवीन शासकीय कोविड लसीकरण केंद्रांमध्ये स्वाध्याय भवन (गणपतीनगर), मुलतानी हॉस्पिटल (मेहरुण) ही दोन कोविड लसीकरण केंद्रे १८ ते ४५ वयोगट असलेल्या व्यक्‍तींसाठी असतील. शाहीर अमरशेख दवाखाना (शनिपेठ), कांताई नेत्रालय (निमखेडी रोड) जळगाव ही कोविड लसीकरण केंद्रे फक्त ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या वयोगटांसाठी असतील. कोव्हिशील्ड लसीकरणाचे लाभार्थीनिहाय दुसरा डोस व पहिला डोसचे अनुक्रमे ७०:३० असे प्रमाण राहील.

कुपन देताना चित्रीकरण होणार
४५ पेक्षा अधिक वय असलेल्या वयोगटाचे लसीकरण होत असलेल्या केंद्रांवर रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना उपलब्ध लसीइतके कुपन देण्यात येतील. त्याबाबत नोंदवहीत नोंदी घेण्यात येऊन कुपन वाटपाचे चित्रीकरण करण्यात येईल.