esakal | Jalgaon:पातोंडा येथील जवान गणेश सोनवणे जम्मू काश्मीर येथे शहिद
sakal

बोलून बातमी शोधा

Soldier

Jalgaon:पातोंडा येथील जवान गणेश सोनवणे जम्मू काश्मीर येथे शहिद

sakal_logo
By
प्रा. भूषण बिरारी

पातोंडा (ता.अमळनेर) : येथील जवान (Soldier) गणेश भिमराव सोनवणे (वय 36 वर्ष) हा सध्या जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) मधील सांबा येथे सेवेत असतांना त्याचे काल सायंकाळी आकस्मिक निधन (Death) झाले. गणेशच्या निधनाची बातमी कळताच कुटूंबांवर व गावावर शोककळा पसरली.

हेही वाचा: गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांची लेक धरती देवरेंचा दणदणीत विजय

गणेश हा 14 मराठा बटालियन मधे सेवेत असून त्याची आता पर्यंत 16 वर्ष 9 महीने सेवा झाली असून तो येत्या डिसेंबर महिन्यात 17 वर्ष सेवा पुर्ण करून घरी परतणार होता तोवर त्याच्यावर काळाने घाला घातला. वयाच्या 20 व्या वर्षी गणेश देशसेवेत दाखल झाला होता. त्याचा देह (शव) आर्मीचे सर्व शासकीय सोपस्कार पुर्ण करून विमानाने मुंबई येथे येणार असून मुंबईहून रुग्णवाहिकेने युनिटच्या सैनिक निगराणीत पातोंडा येथे येणार आहे. त्या करीता आवश्यक होकार त्यांची पत्नी सीमा हिने आर्मी अधिकाऱ्यांना कळवले आहेत.

हेही वाचा: ZP Election : धुळ्यावर भाजपचा झेंडा? अमरीश पटेल यांचं वर्चस्व कायम

उद्या अंत्यसंस्कार

गणेश यांचा अंत्यसंस्कार उद्या (ता. 7) रोजी पातोंडा येथेच सर्व शासकीय इतमामात होणार आहे. गणेशच्या पश्चात आई , पत्नी सीमा , दोन मुली असून प्रांजल (12 वर्ष) व पिऊ (9 वर्ष ) असा परीवार आहे.

loading image
go to top