
जळगाव शहरातून ग्रामीण भागात चेतना व्यसनमुक्ती पदयात्रा नववर्षाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आली.
जळगाव : तरुण पिढीने व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करावी. जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी प्रत्येक तरुणाने कृतिशील पुढाकार घ्यावा. शरीराला हानी करणाऱ्या व्यसनांचे दुष्परिणाम जाणून घेतले पाहिजे, असे सांगत पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी जिल्हावासीयांना ‘नो गुटखा, नो बियर, हॅप्पी न्यू इयर, हॅप्पी न्यू इयर’ अशा शब्दांत नववर्षाच्या सदिच्छा दिल्या.
आवश्य वाचा- ग्रामपंचायत निवडणूका आल्या रंगात; भावी सरपंचांचा आखाडा तापला !
चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जळगाव शहरातून ग्रामीण भागात चेतना व्यसनमुक्ती पदयात्रा नववर्षाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. मुंढे बोलत होते.
तरुणांनी व्यसनापासून दुर रहा
डॉ.मुंढे म्हणाले की, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर व्यसन करणे ही चुकीची प्रथा पडली आहे. शरीराला दुष्परिणाम करणारी व्यसने ही सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि शारीरिक नुकसान पोहोचवत असतात. त्याचबरोबर स्वतःच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी तरुण पिढीने प्रत्येक व्यसनापासून लांब राहिले पाहिजे. असे सांगून तरुणांनी जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत.
जळगाव जिल्ह्यात लवकरच 'कोरोना’ची लस; प्रथम या कर्मचाऱ्यांना दिली जाणार लस !
डॉ. राजेंद्र भालोदे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा डी.एस.कट्यारे, विश्वजीत चौधरी, शिरीष चौधरी, मजूर फेडरेशनचे वाल्मीक पाटील, क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील, मराठी विज्ञान परिषदेचे सचिव प्रा. दिलीप भारंबे, प्रा.आर.ए. पाटील, दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे वासुदेव पाटील, रोटरी क्लबचे जितेंद्र ढाके, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाविस्कर उपस्थित होते.
संपादन- भूषण श्रीखंडे