esakal | आसोद्यातील खारडोहाचा भराव खचला; अपघाताचा धोका वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

Khardoh

आसोद्यातील खारडोहाचा भराव खचला; अपघाताचा धोका वाढला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव: आसोदा-जळगाव रस्त्यावरील खारडोह पुलावरील (Khardoh) मातीचा भराव (soil filling) काल रात्री झालेल्या पावसामुळे वाहून गेला. डोहाच्या पात्रापासून १०० फूट उंचावर व रस्त्याला लागून असलेला भरावच वाहून गेल्याने खारडोह उघडा पडला आहे. यामुळे वाहतुकीसह अपघाताचा धोका (Risk of accident) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या घटनेनंतर गावातील काही सामाजीक कार्यकर्त्यांसह नागरिकांनी रस्त्याच्या कडेला दगड व दिशादर्शक फलक लावून घटनेची माहिती वाहनधारकांना दिली.

हेही वाचा: शहादा तालुक्यात जोरदार पाऊस..पिकांना मिळाले जीवदान


खारडोहाला लागूनच रस्ता असल्याने या ठिकाणी संरक्षण भित्त बांधण्याची मागणी कित्येकदा ग्रामस्थांमार्फत करण्यात आली. मात्र याकडे सार्वजिनक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. नुकत्याच अॅम्युनिटी प्रोग्रॅम अतंर्गत या रस्त्याची बांधणी करण्यात आली आहे. मात्र या डोहावर संरक्षक भिंत न बांधता केवळ कच्चा मातीचा भराव टाकण्यात आला होता. या ठिकाणी सुरक्षित वाहतुक व धोक्यासंबधीचे कोणतेही फलक लावण्यात आले नाही. परिणामी तीन महिन्यापूर्वी एक चाकी गाडी या डोहात घसरून पडल्याची घटनाही घडली होती.

Khardoh

Khardoh

वाहतुकीचाही धोका वाढला

शंभर मीटर लांबीच्या डोहावर संरक्षक भिंतीचा प्रस्ताव शासनाकडे पडून असल्याची माहिती आहे. या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे संरक्षक भिंती अभावी या ठिकाणी अपघातासह वाहतुकीचाही धोका वाढला आहे. दरम्यान या घटनेनंतर गावातील सुज्ञ नागरिकांनी धोका लक्षात घेत कडेला दगड विटा लावून वाहनधारकांच्या वेगावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून अंधारात रेडीअम अथवा पथदिवे, माहिती दर्शक फलक लावावे, संरक्षक भिंतीचे काम तात्काळ सुरु करावे अशी मागणीही ग्रामस्थांमधून केली जात आहे.

loading image
go to top