esakal | शहादा तालुक्यात जोरदार पाऊस..पिकांना मिळाले जीवदान
sakal

बोलून बातमी शोधा

Gomai river flood

शहादा तालुक्यात जोरदार पाऊस..पिकांना मिळाले जीवदान

sakal_logo
By
कमलेश पटेल

शहादा: तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने (Heavy Rain) मंगळवारी रात्री जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी (Farmers) आनंदीत झाले. पावसाने पिकांना (Crop) जीवदान मिळाले असून सर्वदूर झालेल्या मुसळधार पावसामुळे यंदा प्रथमच गोमाई नदीला मोठा पूर (Flood) आला.तर काही ठिकाणी ऊस आडवा झाला.तालुक्यात एकूण ५२१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

हेही वाचा: वाहन लुटणारी आंतरराज्य टोळी जेरबंद..धुळे पोलिसांची कामगिरी


तालुक्यात यंदा खरीपाचे उत्पादन वाया गेल्यातच जमा आहे. रब्बी हंगामाची मदार पुढील पावसावर अवलंबून आहे. यंदा शेतकऱ्यांना आधीच दुबार पेरणीचे संकट होते शेतकरी हवालदिल झाला होता मोठी झालेली पिके वाचवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना शेतकरी करीत होते पिकांना कोळपणीच्या आधार दिला जात होता तालुक्यातील सिंचन प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर होते जिल्ह्यात पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात होती. पाणी टंचाईचे संकट समोर उभे होते मात्र (ता.३१) ला पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह सारेच सुखावले.


रात्री आठ वाजेपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. शहरातील रस्त्यांवर पाणी वाहायला लागले ग्रामीण भागात व सातपुडा पर्वत रांगेत जोरदार पाऊस झाल्याने गोमाई ,सुसरी, कन्हेरी, वाकी नद्यांना पूर आलेत. गोमाई नदीला मोठा पूर आल्याने पूर पाहण्यासाठी काठावरील नागरिकांनी गर्दी केली होती. या पावसामुळे जमिनीत पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल एकंदरीत समाधानकारक पाऊस जरी झाला असेल तरी अद्याप संततधार पाऊस होणे गरजे आहे.

हेही वाचा: चाळीसगाव तालुक्यात १६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान


तरुणांची मदत..
दरम्यान रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अंकलेश्वर बऱ्हाणपुर या मार्गावरील शहादा शिरपूर रस्त्यावर फेस फाटा (ता. शहादा) येथील फरशी पुलाला कठडे नसल्याने शेत शिवारातील ठिबक चे साहित्य तसेच लाकडी ओंडके रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, फेस येथील सरदार वल्लभाई पटेल फाऊंडेशनच्या तरुणांनी पुढाकार घेत मध्यरात्री रस्त्यावरील काटेरी झुडपे व इतर साहित्य दूर करून वाहनधारकांसाठी रस्ता मोकळा केला.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात पीकविमा न देणाऱ्या ११ बँकांवर जबाबदारी निश्‍चित

मंडळ निहाय झालेला पाऊस....
शहादा तालुक्यातील मंडळनिहाय मंगळवारी झालेला पाऊस असा:
शहादा : ५४ कलसाडी: २३,
प्रकाशा: ०३,
ब्राह्मणपुरी :६२,
म्हसावद : ३७,
मोहिदे त.श.: ५८,
वडाळी : ६६ ,
असलोद : ७२,
मंदाणा : ८५ ,
सारंगखेडा: ६१.८ मिमी पाऊस नोंदवण्यात आला. असून तालुक्यात एकूण ५२१.८ मिमी पाऊस झाला.

loading image
go to top