esakal | प्रेम संबंधाच्या संशयावरून भर चौकात तरुणांवर ब्लेडने वार 
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेम संबंधाच्या संशयावरून भर चौकात तरुणांवर ब्लेडने वार 

रक्तबंबाळ होउन मोटरसायकल वरून खाली पडला अचानक झालेल्या घटनेने पूर्ण बाजार पेठेसह तलाव गल्लीत एकच खळबळ उडाली.

प्रेम संबंधाच्या संशयावरून भर चौकात तरुणांवर ब्लेडने वार 

sakal_logo
By
संजय पाटील


पारोळा : बहिणीशी प्रेम संबंध ठेवल्याचा संशयावरून एका तरुणांवर आरोपी ने भर चौकात ब्लेडने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना पारोळा येथे झाल्याने खळबळ उडाली.

या घटने बाबत सुरेश यादव पाटील यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिली आहे. नितीन हा शेतातून मोटर सायकल क्रमांक एम एच 19 बी 6605 ने घरी येत असताना गणेश इले पुढे शिरोडे प्रोव्हिजन दुकाना समोर आरोपी अजय रवींद्र चौधरी याने त्याच्या बहिणीशी नितीन याचे प्रेम संबंध असल्याचा संशय ठेऊन धारदार ब्लेडने नितीन याच्या गळ्यावर सपासप वार केले.  

आणि एकच खळबळ

नितीन हा रक्तबंबाळ होउन मोटरसायकल वरून खाली पडला अचानक झालेल्या घटनेने पूर्ण बाजार पेठेसह तलाव गल्लीत एकच खळबळ उडाली दरम्यान आरोपीने वार केल्या नंतर घटना स्थळावरून पळ काढला या नंतर तलाव गल्लीतील युवकांनी गंभीर जखमी नितीन यास कुटीर रुग्णालयात नेले असता त्यावर प्राथमिक उपचार करून धुळे हलविण्यात आले त्यावर रात्री उशिरा पर्यंत उपचार सुरू होते. 

आरोपीला अटक

सदर दोघां मध्ये यापूर्वी देखील अनेकदा वाद झाल्याचे नागरिकांनी सांगितले . सदर घटने नंतर पोलिसांनी अवघ्या एक तासात आरोपी अजय चौधरी यास जुलामपुरा परिसरातून ताब्यात घेतले दरम्यान न्याय सहहायक प्रयोग शाळेचे पथक येऊन त्यांनी घटना स्थळावरून जखमी नितीन याच्या रक्ताचे नमुने घेतले यावेळी पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे,सहाय्यपक पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड, ए पी आय रवींद्र बागुल उपस्थित होते. संशयीत आरोपी अजय चौधरी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

loading image