‘बीएचआर’- ‘वॉटरग्रेस’शी गिरीश महाजनांचा संबध नाहीच 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

बीएचआर’ठेवीदार प्रकरणात पोलीसांनी कारवाई सुरू केली आहेत. यात काही जणांना अटक करण्यात आली आहे. तर काही जण फरार आहेत.

जळगाव : ‘बीएचआर’ठेवीदार प्रकरणात झंवर यांच्या कार्यालयात वॉटरग्रेस आणि गिरीश महाजन यांचे लेटरपॅड सापडल्यामुळे त्यांचा संबध असल्याचे विरोधकाकडून आरोप होत आहेत. हे अत्यंत चुकिचे आहे, सुनील झंवर हे महाजनांचे मित्र आहेत. मित्रत्व अलग आणि झंवर यांचे वैयक्तीक व्यवहार वेगळे आहेत. त्यामुळे यात आमदार गिरीश महाजन यांचा कोणताही संबध नाही असे मत भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 
जळगाव येथे भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी, डॉ.राध्येश्‍याम चौधरी उपस्थित होते. ‘बीएचआर’ठेवीदार प्रकरणात पोलीसांनी कारवाई सुरू केली आहेत. यात काही जणांना अटक करण्यात आली आहे. तर काही जण फरार आहेत. या प्रकरणातील सुनील झंवर यांच्या कार्यालयावर पोलीसांनी छापा टाकला असतांना त्या ठिकाणी भाजप नेते व आमदार गिरीश महाजन यांचे लेटरपॅड सापडले. तसेच जळगाव महापालिकेतील ‘वॉटरग्रेस’ या सफाई मक्तेदाराचे कागदपत्र सापडले. तसेच विरोधकांतर्फे आरोप करण्यात येत होता. तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी देखील कुणाचेही नाव न घेता बड्या नेत्‍याचे नाव असल्‍याचे सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणाशी आमदार गिरीश महाजन यांच्या बाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. 
या संदर्भात भाजपतर्फे आज खुलासा करण्यात आला, याबाबत आमदार सुरेश भोळे म्हणाले कि, सुनील झवर तसेच वॉटरग्रेस व बीएचआर प्रकरणात आमदार गिरीश महाजन यांचा कोणताही संबध नाही. सुनील झंवर हे महाजन यांचे मित्र आहेत. झंवर यांच्या व्यवहार कुणाशी असतील तर त्याचा आमदार महाजन यांचा संबध नाही. केवळ मित्रत्वावरून या प्रकरणात आमदार महाजन यांचा संबध जोडणे चुकीचे आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bhr patsanstha and watergress not conection girish mahajan