esakal | जळगाव, भुसावळ, अमळनेर  अनलॉक ः व्यापारी संकुले बंदच राहणार !
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव, भुसावळ, अमळनेर  अनलॉक ः व्यापारी संकुले बंदच राहणार !

जळगाव जिल्ह्यात सर्वत्र बाजारपेठेची हीच वेळ असेल. जळगाव महापालिका क्षेत्रातील व्यापारी संकुले, मॉल बंदच ठेवण्यात येतील. नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये. मास्कचा वापर करावा.

जळगाव, भुसावळ, अमळनेर  अनलॉक ः व्यापारी संकुले बंदच राहणार !

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगावः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ७ ते १३ जुलैदरम्यान जळगावसह भुसावळ, अमळनेर या ठिकाणी पाळण्यात आलेला लोकल लॉकडाऊन उद्यापासून (ता.१४) अनलॉक होत आहे. जळगाव शहरातील सर्व व्यापारी संकुले बंदच राहतील. सकाळी ९ ते सायंकाळी ७ दरम्यान बाजारपेठा सुरू राहतील. बाजारपेठेत समविषम तारखांना जशी दुकाने पूर्वी सुरू असायची तशीच आताही सुरू राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दिली. 

जळगाव जिल्ह्यात सर्वत्र बाजारपेठेची हीच वेळ असेल. जळगाव महापालिका क्षेत्रातील व्यापारी संकुले, मॉल बंदच ठेवण्यात येतील. नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये. मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सींग पाळावे. नागरिकांनी ७ ते १३ स्वयंशिस्त पाळली. तशी शिस्त पाळली तर नक्कीच कोरोना संसर्गापासून आपण बचाव करू शकू. 

निवासी हॉटेल्स सुरू 
शहरात ज्या निवासी हॉटेल्स आहे तेथे ३३ टक्के ग्राहकांना प्रवेश देण्यात येईल. सोशल डिस्ट्न्स पाळणे बंधन कारक आहे. रेस्टॉरंट, भोजनालये इतर हॉटेल्स बंदच राहतील. मात्र त्यातून पार्सलची सुविधा ग्राहकांना देता येईल. 

पॉझिटिव्ह येण्याचा दर घटला 
लॉकडाउनचा काही फायदा झाला का असे विचारले असता, जर पूर्वी शंभर नागरिकांची तपासणी होत होती तेव्हा २८ रूग्ण पाॅझिटीव्ह निघत होते. आता १०० नागरिकांची तपासणी केली तर १४ रुग्ण पॉझिटिव्ह येतात. 

गोलाणीसह इतर व्यापारी संकुले बंदच 
शासनाने एकल दुकानांना समविषम तारखांना, परवानगी दिली आहे. मात्र व्यापारी संकूले, मॉलल बंदच ठेवण्याचे आदेश आहेत. जळगाव शहरातील गोलाणी कॉम्प्लेक्स, फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, भास्कर मार्केट यासह सर्वच कॉम्प्लेक्स बंद राहतील. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image