गाड्यांच्या नंबरप्लेट बदलून असाही कारनामा

bike robbery
bike robbery

जळगाव : दुचाकी चोरी करुन तिच्या नंबरप्लेट बदलावून वापर करणाऱ्या चोरट्यांचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील नेहरू पुतळासमोरील आयडीबीआय बँकेसमोरून दुचाकी चोरणाऱ्या जीवन सुकदेव ठाकरे (वय २२) आणि पवन सुनिल कोळी (वय २०) या दोन चोरट्यांना शहर पोलीसांनी शिवाजीनगरातून अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. 

शहर पोलीसात होता गुन्हा दाखल 
शहरातील शिवाजीनगरातील चंद्रकांत गजानन बोदवडे हे जळगावात १२ सप्टेंबर २०१९ रोजी शहरातील नेहरू पुतळ्याजवळी आयडीबीआय बँकेजवळ दुचाकी (एमएच १९ सीजी ३५६५) डीलक्स लावून गणपती विसर्जनासाठी मिरवणूकीत गेले. दरम्यान मिरवणूकीनंतर दुचाकी जागेवर आढळून आली नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. 

यांच्या पथकाची कारवाई 
१४ डिसेंबर २०२० रोजी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भास्कर ठाकरे, पोलीस नाईक गणेश पाटील, ओम पंचलिंग आणि निलेश पाटील हे शिवाजीनगरातील स्मशानभूमीजवळ पेट्रोलिंग करत असतांना दोन जण संशयास्पद दुचाकीवर असल्याचे दिसून आले. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलीस निरिक्षक धनंजय येरुळे यांना माहिती दिली. त्युनसार शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहाय्य फौजदार वासुदेव सोनवणे, पोहकॉ विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, अक्रम शेख, प्रफुल्ल धांडे, रतन गिते यांच्यासह पो.ना. गणेश पाटील यांनी यांच्या पथकाने चौकशी केली असता, जिवन सुकदेव ठाकरे (वय २२) आणि पवन सुनिल कोळी (वय २०, दोन्ही रा. कोळी वाडा डांभूर्णी) अशी दोघांची नावे निष्पन्न झाली. चौकशीत त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडून बनावट नंबर असलेल्या दोन दुचाक्या हस्तगत करण्यात आले आहे. यातील एक साथीदार फरार आहे. पुढील तपास पो.ना. भास्कर ठाकरे करीत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com