esakal | पालकमंत्री करताय काय ? रोज हजार रेमडेसिव्हिर हवेत, उपलब्ध चारशेच !

बोलून बातमी शोधा

पालकमंत्री करताय काय ? रोज हजार रेमडेसिव्हिर हवेत, उपलब्ध चारशेच !

पालकमंत्री करताय काय ? रोज हजार रेमडेसिव्हिर हवेत, उपलब्ध चारशेच !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात व्हेंटिलेटर, आयसीयूतील गंभीर रुग्णसंख्येच्या तुलनेत जिल्ह्याला हजार रेमडेसिव्हिरची दररोज गरज असताना केवळ तीन-चारशे व्हायल्स उपलब्ध होत असून, पालकमंत्री नेमके काय करतायत, असा प्रश्‍न भाजपने उपस्थित केला आहे.

या संदर्भात भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची स्थिती, रेमडेसिव्हिरची गरज व उपलब्धता आणि त्याबाबत पालकमंत्र्यांच्या उदासीनतेवर प्रश्‍न उपस्थित केला आहे.

हेही वाचा: जळगावात कोरोनाचा कहर सुरुच; चारवर्षीय बालिकेसह २१ जणांचा मृत्यू

गंभीर रुग्ण दोन हजारांवर

जिल्ह्यात ११५ खासगी कोविड रुग्णालये आहेत. त्यात ऑक्सिजनवर असलेले रुग्ण एक हजार, आयसीयूतील ६०० व व्हेंटिलेटरवर दीडशे रुग्ण आहेत. म्हणजे एकूण एक हजार ७४० रुग्णांना दररोज रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज असते. त्यातील ऑक्सिजनवरील रुग्ण सोडले तरी कमीत कमी एक हजार व्हायल्सची दररोजची गरज आहे.

तीन-चारशेवर समाधान

असे असतानाही जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ३०० ते ४०० इंजेक्शनच्या वर पुरवठा होत नाही. सोमवारी प्रशासनाने फक्त ३०० इंजेक्शनवाटप केले. आयसीयूत दाखल रुग्णांनाही ते पुरणारे नाहीत. गेल्या २० दिवसांत एकही दिवस पुरेशी इंजेक्शन उपलब्ध झाली नाहीत. खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नांनी एकाच दिवसात हजार इंजेक्शन प्राप्त झाली होती. असे असताना कॅबिनेट मंत्री असलेले गुलाबराव पाटील, त्यांचे सहकारी आमदार जिल्ह्यासाठी काय करतायत, असा प्रश्‍नही भाजपने केला आहे.

पालकमंत्री कुठे आहेत?

एरवी भाजपला शिव्याशाप देणारे, भीमगर्जना करणारे, मुलूखमैदान तोफ म्हणविणारे पालकमंत्री सध्या नेमके कुठे आहेत? रेमडेसिव्हिरचा काळा बाजार होत असताना त्यांना काहीच पडलेले नाही, अशी टीका भाजपने या पत्राद्वारे केली आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे