esakal | जळगावात कोरोनाचा कहर सुरुच; चारवर्षीय बालिकेसह २१ जणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

covid 19
जळगावात कोरोनाचा कहर सुरुच; चारवर्षीय बालिकेसह २१ जणांचा मृत्यू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या दररोज आढळून येणाऱ्या नव्या बाधितांची संख्या स्थिर असली तरी मृत्यूसत्र सुरुच आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात चार वर्षीय बालिकेसह आणखी २१ जणांचा बळी गेला. तर नवे १०४८ रुग्ण समोर आले.

हेही वाचा: गावात स्वत: आदिवासी रणरागिणी उतरली मैदानात !

मार्च व एप्रिलच्या प्रारंभी कोरोनाने घातलेले थैमान जिल्ह्यात काहीअंशी कमी झाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपूासून नव्याने बाधितांची संख्या स्थिर असून बरे होणाऱ्यांचा आकडा समाधानकारक आहे. सोमवारी १०४८ नवे रुग्ण आढळून आले तर १०१५ रुग्ण दिवसभरात बरे झाले. जिल्ह्यातील रुग्णसंख्या १ लाख १७ हजार ९१६ वर पोचली आहे. तर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाक ४ हजार ९०६ झाला आहे.

२१०० बळी

जिल्ह्यातील मृत्यूदर मात्र कायम आहे. दररोज २०पेक्षा अधिक जणांचा बळी जात असून सोमवारीही २१ जणांचा मृत्यू झाला. त्यात पाचोरा तालुक्यातील चार वर्षीय बालिका व ३५ वर्षीय युवकाचा समावेश आहे. बोदवड व धरणगाव तालुक्यातही तिशीतील तरुणांचा बळी गेला असून जिल्ह्यातील बळींचा आकडा २०९९ झाला आहे. कोविड संशयित व अन्य आजारांनी आज १६ जणांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: सतत..सातपुडा पेटतोय; जंगली प्राण्यांचा होरपळुन मृत्यू !

भुसावळ हॉटस्पॉट

जळगाव शहरासह आता भुसावळ तालुका हॉटस्पॉट बनत आहे. जळगाव शहरात सोमवारी १५९ रुग्ण आढळून आले तर २१९ बरे झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या प्रथमच दोन हजारांच्या आत १९५०वर आली आहे. तर भुसावळ तालुक्यात १५७ रुग्ण समोर आलेत.

अन्य ठिकाणचे रुग्ण असे : जळगाव ग्रामीण ५३, अमळनेर ७१, चोपडा ७२, पाचोरा ५७, भडगाव १८, धरणगाव ४२, यावल ३३, एरंडोल ११३, जामनेर ३७, रावेर ७४, पारोळा २८, चाळीसगाव ६६, मुक्ताईनगर ३७, बोदवड १५, अन्य जिल्ह्यातील १६.

हेही वाचा: कोरोनामुळे या वर्षीही सासुरवाशीणींची आखाजी होणार सासरीच..!

लसीकरण रुळावर

जिल्ह्यात रविवारी सायंकाळी कोरोना प्रतिबंधक लशींचे डोस प्राप्त झाल्यानंतर सोमवारी विविध केंद्रांवर लसीकरणाची गाडी रुळावर आल्याचे चित्र दिसून आले. विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ५ हजारांहून अधिक तर अन्य केंद्रांवर चांगला प्रतिसाद मिळाल्याने सोमवारी ९ हजार ९४९ जणांना लसीचा पहिला डोस तर ७ हजार ५०१ जणांनी लशीचा दुसरा डोस घेतला.

संपादन- भूषण श्रीखंडे