esakal | खडसेंच्या पक्षांतरानंतर ‘डॅमेज कंट्रोल’साठी संघटनमंत्र्यांची जळगाव वारी 
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

खडसेंच्या गेल्या आठवड्यातील राष्ट्रवादीतील प्रवेशाने राज्यातील राजकारण ढवळून निघाले. या पक्षांतराचा खानदेश, उत्तर महाराष्ट्रातील परिणाम लक्षात घेता आज प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी जळगाव जिल्ह्याचा दौरा करत बैठक घेतली.

खडसेंच्या पक्षांतरानंतर ‘डॅमेज कंट्रोल’साठी संघटनमंत्र्यांची जळगाव वारी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे होणाऱ्या संभाव्य ‘डॅमेच कंट्रोल’च्या चाचपणीसाठी भाजपच्या प्रदेश संघटनमंत्र्यांनी आज जळगावचा दौरा केला. पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांनी आढावा घेतला. तर माजी मंत्री गिरीश महाजनांनी १९९०च्या आधीपासूनच जळगाव जिल्ह्यात भाजपचे आमदार, खासदार निवडून येत आहेत, असा दावा करत खडसेंच्या दाव्यालाही छेद दिला. 

खडसेंच्या गेल्या आठवड्यातील राष्ट्रवादीतील प्रवेशाने राज्यातील राजकारण ढवळून निघाले. या पक्षांतराचा खानदेश, उत्तर महाराष्ट्रातील परिणाम लक्षात घेता आज प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी जळगाव जिल्ह्याचा दौरा करत बैठक घेतली. बैठकीस गिरीश महाजन, विभागीय संघटनमंत्री रवी अनासपुरे, खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदूलाल पटेल, माजी आमदार स्मिता वाघ, ॲड. किशोर काळकर, महापौर भारती सोनवणे, जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, आदी उपस्थित होते. 

बैठकीत बोलताना पुराणिक म्हणाले, आगामी काळात जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यासाठी आतापासूनच पक्षसंघटनेकडे लक्ष द्यावे लागेल. पक्षाकडून येणारे कार्यक्रम, उपक्रम आणि अभियान प्रामाणिकपणे जबाबदारीने पार पाडावे. 

खडसेंच्या विधानास महाजनांकडून छेद
बैठकीत मार्गदर्शन करताना गिरीश महाजन म्हणाले, हा कार्यकर्त्यांचा व विचारांनी चालणारा पक्ष आहे. तो कार्यकर्त्यांच्या बळावरच उभा आहे. १९८५पासून जळगाव जिल्ह्यात आपल्या पक्षाचे आमदार, खासदार निवडून येत आहेत. त्यावेळी डॉ. गुणवंतराव सरोदे, चाळीसगगावचे उत्तमराव पाटील हे निवडून आले होते. प्रत्येकाचे पक्षसंघटनेत योगदान असे म्हणत महाजनांनी खडसेंकडून सातत्याने होत असलेल्या पक्षकार्याबद्दलच्या विधानास छेद दिला. 
 

loading image
go to top