‘ओबीसी’ आरक्षणावरून भाजपकडून जातीजातीत तेढ

भाजपला जनता घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. भाजप नेत्यांच्या या कुरघोडीचा आम्ही निषेध करतो.
Satish Patil
Satish PatilSatish Patil


जळगाव :
राज्यात भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता असताना कोणत्याही साखर कारखान्यावर, मंत्र्यावर ‘ईडी’ची कारवाई केली नाही. आता सत्ता जाताच भाजपचे नेते महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर ‘ईडी’तर्फे चौकशी सुरू करून राज्यातील स्थिर असलेले महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सतीश पाटील (State Vice President Dr. Satish Patil) यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. ‘ओबीसी’ आरक्षणावरून (‘OBC’ reservation) भाजप जातीजातीत तेढ निर्माण करून भांडणे लावत असल्याचा आरोपही श्री. पाटील यांनी केला. (bjp obc reservation creating social controversy ncp leader allegations)

Satish Patil
बीएचआर घोटाळा; कंडारेला पळवणारे अन्‌ मदतगार रडारवर

राष्ट्रवादी कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, माजी आमदार मनीष जैन, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महिला अध्यक्षा मंगला पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.


राज्यात पावसाने वक्रदृष्टी केली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. दुसरीकडे केंद्र शासन पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमती दिवसेंदिवस वाढवत आहे. जळगाव जिल्ह्यात बीएचआर पतसंस्थेतील मोठ्या घोटाळ्यासह अनेक ज्वलंत प्रश्‍न आहेत. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी भाजपच्या नेत्यांना राज्यातील मंत्र्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात रस आहे. चुकीच्या पद्धतीने चौकशी लावून ते राज्यातील सरकार अस्थिर करू पाहत आहेत. सर्वसामान्यांना रोज लागणाऱ्या गॅसच्या दरात नुकतीच वाढ झाली आहे. ओबीसी आरक्षणावरून जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम भाजप करीत आहेत. उठसूट काहीही बोलणाऱ्या भाजपच्या पडवळकरांना जनतेने घरी बसविले. त्याप्रमाणे भाजपला जनता घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. भाजप नेत्यांच्या या कुरघोडीचा आम्ही निषेध करतो.


जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकटीकरणाचे काम सुरू झाले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्याने आता आमदारांची संख्या एकवरून अकरावर जाईल. राष्ट्रवादीत गटतट नाहीत, असेल तर ते मिटवून सर्वांना एकत्र आणून आगामी जिल्हा परिषद, पालिका, महापालिका, बाजार समित्यांच्या निवडणुका लढवून त्यावर राष्ट्रवादीची सत्ता आणू, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. माजी मंत्री देवकर, जेडीसीसीचे संचालक पवार यांनीही मनोगतात सर्वांना एकत्र येण्याचे व राष्ट्रवादी वाढविण्याचे आवाहन केले.

Satish Patil
जळगाव जिल्ह्यात पहिल्या, दुसऱ्या लाटेतील नीचांकी रुग्णसंख्या



विनोद देशमुख पुन्हा सक्रिय

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विनोद देशमुख यांच्यावर गेल्या वर्षी पक्षाने निलंबनाची कारवाई केली होती. मात्र काही पदाधिकाऱ्यांनी चुका केल्या तरी त्यांना दुरुस्त करण्याची संधी द्यावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मी केली होती. त्यामुळे देशमुख यांना परत पक्षात घेतले आहे. लवकरच ते सक्रिय होतील, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.


छायाचित्रावर शाई फेकणे निषेधार्ह
पंतप्रधानांच्या छायाचित्रावर शाई फेकल्याची घटना निषेधार्ह आहे. भावनेच्या भरात आंदोलनात शाई फेकली गेली असावी, त्याबद्दल संबंधितातर्फे मी दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com