बीएचआर घोटाळा; कंडारेला पळवणारे अन्‌ मदतगार रडारवर

मिळून आलेल्या चारही मोबाईलचे कॉल डिटेल्स काढून पोलिस पुढील तपास करणार आहेत
bhr
bhrbhr



जळगाव : बीएचआर पतसंस्थेचा (BHR Credit Society) शासन नियुक्त अवसायक तथा मास्टरमाइंड जितेंद्र कंडारे हा गुन्हा (Crime) दाखल झाल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून फरारी हेाता. पुण्यात (Pune) गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथके जळगावकडे (Jalgaon) प्रस्थान करत असतानाच जितेंद्र कंडारे, सुनील झंवर यांनी शहरातून धूम ठोकली होती. सात महिन्यांनंतर अटक झालेला कंडारे या कालावधीत दिल्ली (Delhi) , गुजरात(Gujarat), मध्य प्रदेशसह (Madhya Pradesh) इतर राज्यांमध्ये भटकंतीवर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच कंडारे जवळून चार मोबाईल जप्त करण्यात आले असून, या मोबाईलवरून कंडारे कुणाकुणाच्या संपर्कात होता? सुनील झंवर, कुणाल शहा यांच्यासोबत त्याचे काही बोलणे झालेय का? तसेच मागील सात महिन्यांत त्याला लपून राहण्यास कुणी-कुणी मदत केली?, अशी सर्वजण आता पोलिस (Police) तपासाच्या रडारवर आली आहेत. स्वतंत्र पथक याची माहिती घेत आहे.
(police search for contact with main suspect in bhr scam case)

bhr
भारत-बांगलादेशच्या 'या' करारात चाळीसगावच्या शिक्षकाचा सिंहाचा वाटा

पुण्यात बीएचआर पतसंस्थेतील ठेवपावत्या मॅचिंग प्रकरणाचा गुन्हा दाखल झाल्यापासून संस्थेवर शासन आदेशाने नियुक्त जितेंद्र कंडारे गेल्या सात महिन्यांपासून फरारी होता. याकाळात त्याने दिल्ली, गुजरात व मध्य प्रदेश दर्शनासह इतर राज्यांत वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे आणि पतसंस्थेचा कारभार इतर राज्यातही असून, तेथेही कार्यालये होती. दुसरीकडे कंडारेला अटक केल्यानंतर त्याच्याजवळून पतसंस्थेचा बॅकअप डेटा असलेल्या तीन हार्डडिस्क, चार मोबाईल हॅन्डसेट आणि पतसंस्थेशी संबंधित काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळून आली. अर्थात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे तपास पथक जळगावी रवाना झाल्यानंतर जितेंद्र कंडारे आदल्याच सायंकाळी व सुनील झंवर हादेखील शहरातून अचानक गायब झाला आहे. कंडारेला सात महिन्यांनंतर अटक झाली. मात्र, कंडारेकडे सापडलेला बॅकअप, इतर महत्त्वाचे दस्तऐवज यावरून त्यांना अटकेची पूर्वकल्पना असल्याचा अंदाज या सर्व घटनाक्रमातून येत आहे.

संपर्कातील कोणकोण...


आता आर्थिक गुन्हे शाखा कंडारे मागील सात महिन्यांपासून त्याचे नेमके वास्तव्य कोठे होते?, तसेच तो या कालावधीत कोणाच्या संपर्कात (टच) होता, याचा पोलिस तपास करणार आहेत. कारण पोलिसांना हवे असलेल्या संशयित आरोपींपैकी कुणाल शहा, सुनील झंवर, माहेश्वरी आणि योगेश साखलाच्या कायम संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे कंडारेकडून मिळून आलेल्या चारही मोबाईलचे कॉल डिटेल्स काढून पोलिस पुढील तपास करणार आहेत.


bhr
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोदीच्या प्रतिमेवर शाई फेकली!

कंडारे कुणाच्या गुडबुकमध्ये


फरारीच्या कालावधीमध्ये कंडारे ज्या ठिकाणी वास्तव्यास होता त्या ठिकाणी त्याला प्रत्यक्ष नेऊन पोलिस तपास करणार आहेत. दुसरीकडे कंडारेची बँक खाती व स्थावर जंगम मालमत्ता याबाबतही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कारण घोटाळ्याची रक्कम कंडारेने नेमकी कुठे अडकवली आहे? याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. जितेंद्र कंडारेच्या नियुक्तीचा हट्ट करणारे, नियुक्तीनंतर त्यांच्या कडून कामे काढून घेणारे मोठे उद्योजक, राजकारणी आणि कर्ज खातेदार यांच्यापैकीच कुणीतरी फरारी कालावधीत त्याला मदत करत असल्याची माहिती समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com