
भाजपने जे काम केले नाही ते महाविकास आघाडीकडीचे निवडणून आलेले उमेदवार करती अशी अपेक्षा सुशीक्षीत मतदारांना वाटत आहे.
जळगाव ः विधानसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला धुर चारली आहे. पुणे, नागपूरचे परंपरांगत मतदार संघ ते टिकवू शकले नाही. त्यामुळे भाजपचा हा पराभव हा त्यांच्या हंमपणा व फाजील नेतृत्वामुळे झाला आहे असा खोचक टोला भाजपला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी आज लगावला.
विधान परिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या यशाबाबत एकनाथ खडसे आपले मत माध्यमासमोर व्यक्त केले. पुढे बोलतांना खडसे म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारच्या एका वर्षाच्या कामाचे मुल्यमापनाचे हे यश आहे. भाजपने जे काम केले नाही ते महाविकास आघाडीकडीचे निवडणून आलेले उमेदवार करती अशी अपेक्षा सुशीक्षीत मतदारांना वाटत आहे. भाजपचा फाजील आत्मविश्वासामूळेच त्यांचा पराभव झालेला आहे.
धुळे-नंदूरबारची जागा त्यांची नव्हतीच
धुळे-नंदूरबारची जागा भाजपने ११७ मत फोडून जिंकली. परंतू त्यांना माहित होते के मत फोडल्या शिवाय भाजप निवडूण येऊ शकत नाही. महाविकास आघाडीचे मतदान फुटले म्हणून ते जिंकले ती जागा त्यांची नव्हतीच असे खडसे म्हणाले.
चंदक्रांतदादा आता हिमालायत जातील का ?
भाजपची पुणे येथील चंद्रकांत पाटील यांना तर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नागपुर ची परंपरागत जागा देखील टिकवता आली नाही. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वात मी पणाचा अहंपणाचा प्रभाव आता दिसू लागला आहे. जागा निवडणून आली नाही तर मी हिमालयात जाईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आता खरचं हिमालायात चंद्रकांतदादा जाता का ? याचा तपास करावा लागेल असे खडसेंनी चांगलेच मार्णिक शाब्दीक टोले लगावले.