esakal | जळगावात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार करणारी टोळी पकडली

बोलून बातमी शोधा

जळगावात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार करणारी टोळी पकडली
जळगावात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार करणारी टोळी पकडली
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव :
जिल्‍हा रुग्णालयासह शहरात सात ते आठ हजार कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. कोरोनावर प्रभावी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा जिल्‍हा प्रशासनाकडेच तुटवडा असल्याने पूर्वीपासूनच स्टॉक करून ठेवलेले आणि उपलब्ध इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने ११ संशयितांना शहराच्या विविध भागांतून ताब्यात घेतले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ब्लॅक मार्केटिंगचे जळगाव केंद्रच असल्याचा अंदाज या कारवाईतून खरा ठरला आहे.

हेही वाचा: मामा- भाची सोबत जात असताना अपघात; मामाचा जागीच मृत्‍यू

राज्यासह जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा विस्फोट झाला आहे. दररोज दीड हजाराच्या संख्येत संक्रमित रुग्ण उपचारार्थ दाखल होत आहेत. कोरोना संक्रमण झालेल्या गंभीर रुग्णासाठी अमृत मानल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर या इंजेक्शनच्या उत्पादनावर ताण पडत आहे. परिणामी कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन पाच हजारांचे इंजेक्शन २५ हजारांहून अधिक रकमेने विक्रीचा धंदा अवलंबविला आहे. मुंबई, ठाणे, नाशिकनंतर जळगावातही या टोळीने हातपाय पसरले असून, रेमडेसिव्हिरच्या ब्लॅकने विक्रीच्या प्रचंड तक्रारी जिल्‍हा व पोलिस प्रशासनाला प्राप्त होत होत्या. त्यांची दखल घेत आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी करणारे आणि पुरवठा करणाऱ्यांवर पाळत ठेवण्यात आली. शहरात वेगवेळ्या ठिकाणी गुप्तपणे धंदा करणाऱ्या ११ संशयितांना पोलिसांनी एकाच वेळी अटक केल्याने खळबळ माजली आहे.

हेही वाचा: ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विनाकारण प्रवास; तर महिनाभराचा पगार क्षणात जाणार

उत्तर महाराष्ट्रातील मोठी कारवाई
गेल्या महिनाभरापासून सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा या सर्व प्रकारांवर बारीक अभ्यास करत होते. ठोस माहिती हाती लागताच त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांसह क्यूआरटी फोर्स, सोबत घेत शहरात डोमिनोझ पिझ्झा, रामानंदनगर परिसरात रेल्वे रुळालगत, भास्कर मार्केट यासह इतर ठिकाणांहून पाच तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काही जणांची नावे समोर आली. यानंतर त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. चौकशीअंती गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही श्री. चिंथा यांनी सांगितले.

संपादन- भूषण श्रीखंडे