esakal | स्वखर्चाने जलवाहिनी टाकून पाणीटंचाईवर मात
sakal

बोलून बातमी शोधा

water supply bodwad palika member

स्वखर्चाने जलवाहिनी टाकून पाणीटंचाईवर मात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बोदवड (जळगाव) : शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई (water scarcity) जाणवत असून, तब्बल १२ ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे, प्रसंगी पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. मात्र, नागरिकांची ही वणवण थांबविण्यासाठी प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक दीपक झांबड (Bodwad palika member dipak jhambad) यांनी विहिरीवरून तीन लाख रुपये स्वखर्चाने प्रभागात नवीन जलवाहिनी टाकून २५ स्टँड पोल काढत दिवसाला दोन तास पाणीपुरवठा केला जात आहे. (bodwad-palika-member-water-supply-water-scarcity)

हेही वाचा: आनंद वार्ता..कमी पॉझिटिव्हिटीत जळगाव जिल्हा राज्यात दुसरा

शहरात नगरपंचायतीकडून ‘ओडीए’ योजनेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत बिघाड झाल्यामुळे व शासकीय स्तरावर उपाययोजनांसाठी लागणारा वेळ पाहता शहरात १२ ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तसेच विहीर व कूपनलिकांची पाणीपातळी कमी झाल्याने शहरात नागरिक या पाणीटंचाईला त्रासले असून, पाण्यासाठी नागरिकांची पाण्यासाठी होणारी आर्थिक चणचण थांबविण्यासाठी प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक दीपक झांबड यांनी आपल्या प्रभागातील विहिरीवरून तीन लाख रुपये स्वत:च्या खिशातून खर्च करून प्रभागात जलवाहिनी करून २५ स्टँड पोस्ट काढत दिवसाला दोन तास पाणी गोरक्षनाथनगर, जावरेवाडा, मेहतरवाडा, मारवाडी गल्ली, कुरेशी रस्ता, हनुमान मंदिर परिसर या भागात जलवाहिनीद्वारे नागरिकांची तहान भागवत आहे. याआधी दहा घर मिळून टँकरनेदेखील पाणीपुरवठा झांबड यांनी प्रभागात केला होता.

स्टँड पोस्ट व पाणी टाकी उभारणार

भीषण पाणीटंचाई पाहता विहिरीतील गाळ, तसेच रेणुकादेवी मंदिर परिसरात कूपनलिकांमध्ये मोटारपंप टाकून नागरिकांना पाणीपुरवठा होईल, अशी सोय करत असून, आपल्या प्रभागात पाणीटंचाई भासणार नाही, यासाठी नवीन कूपनलिका करून जलवाहिनी टाकून आणखी स्टँड पोस्ट व पाणी टाकी उभारण्याचा मानस श्री. झांबड यांचा आहे. यामुळे शहरात त्यांचे कौतुक होत आहे.

प्रभागात पाण्याची व्यवस्था उत्तम झाली असून, संबंधित विहिरीतील गाळ काढणे व पाणी टाकी बांधकाम करण्याची गरज आहे, म्हणजे प्रभागात पाणीटंचाईच राहणार नाही.

-प्रदीप बडगुजर, नागरिक, प्रभाग सहा, बोदवड