esakal | आनंद वार्ता..कमी पॉझिटिव्हिटीत जळगाव जिल्हा राज्यात दुसरा
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon corona update

आनंद वार्ता..कमी पॉझिटिव्हिटीत जळगाव जिल्हा राज्यात दुसरा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : लॉकडाउनचे सकारात्मक परिणाम जिल्ह्यात दिसू लागले आहेत. गेल्या आठवड्यात सर्वांत कमी पॉझिटिव्हिटी रेट नोंदल्या गेलेल्या राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी ३.८३ टक्क्यांपर्यंत घसरली असून, पहिल्या क्रमांकावर ३.४४ टक्के रेट असलेला भंडारा जिल्हा आहे. (jalgaon-coronavirus-update-positive-patient-ratio-second-rannk-state-in-last-week)

अर्थात, शासकीय यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार हा आकडा येतो. प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाकडून रोज प्राप्त होणारे आकडे वेगळे आहेत. त्यानुसारही जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी चार टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

हेही वाचा: ‘कोरोना'मूळे मृत झालेल्या कुटुंबीयांना मिळाला मदतीचा हात !

साताऱ्यात सर्वाधिक

शासकीय यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट सातारा जिल्ह्याचा (२१.९३ टक्के), त्याखालोखाल सिंधुदुर्ग (२१.५०) व रत्नागिरी (१९.८९) यांचा समावेश आहे. सर्वांत कमी पॉझिव्हिटी असलेल्या जिल्ह्यांमध्ये भंडारा (३.४४) पहिल्या क्रमांकावर तर जळगाव जिल्हा (३.८३) दुसऱ्या, तर तिसऱ्या क्रमांकावर गोंदिया (३.९८) जिल्हा आहे.

जिल्ह्याची स्थिती अशी

तारीख --- चाचण्या -- रुग्ण ---- पॉझिटिव्हिटी

१८ ---- ६,२७६ ---- ५२१ --- ८.३ टक्के

१९ ---- ७,६६७ ---- ४९४ ---- ६.४ टक्के

२० ---- ६,११८ ---- ३५७ ---- ५.८ टक्के

२१ ---- १०,९१३ --- ४१० ----३.७ टक्के

२२ ---- ८,४४१ ---- ४०५ ---- ४.७ टक्के

२३ ---- ७,९२१ ---- ३६२ ---- ४.५ टक्के

२४ ---- ११,९१८ --- ३१२ ---- २.६ टक्के

२५ ---- ६,७०२ ---- २९१ ----- ४.३ टक्के