बहिणीने राखी बांधली पाहुणचार केला..आणि वाटेत भावाचा अपघात झाला

Jalgaon Accident News: शेलवड - सुरवाडे मार्गे निघालेले असताना रस्त्यातच मुक्तळ- सुरवाडे दरम्यान दुचाकी घसरून पडले.
Accident
Accident
Updated on

बोदवड : बहिणीकडून रक्षाबंधन करून घराकडे परतणाऱ्या भावाचा अपघातात (Accident) मृत्यू (Death) झाला. जालमसिंग नयनसिंग चौधरी (वय ५५) असे मृताचे नाव असून, ही घटना रविवारी बोदवड तालुक्यातील मुक्तळ ते सुरवाडे दरम्यान घडली.

Accident
जळगाव जिल्ह्यातील १८ पालिका, पंचायत, नगर परिषदेची रणधुमाळी


जालमसिंग (रा. खडका, ता. भुसावळ) हे घिर्णी येथून बहीण मीराबाई यांच्याकडून रक्षाबंधन साजरा करून परतताना असताना दुचाकी घसरून पडल्याने (एमएच १९, एआर ७१६६) त्यांचा जागीच मृत्यू झाला. जालमसिंग चौधरी हे खडका येथून रविवारी सकाळी पत्नी कल्पनाबाई यांना सोबत घेऊन सासरवाडी मलकापूर (जि. बुलडाणा) येथे गेले. तेथे सासरे उमरावसिग दशरथ पाटील यांच्याकडे पत्नीला रक्षाबंधनासाठी सोडून पुढे घिर्णी बेलाड येथे मेहुणे फुलसिंग शंकरसिंग राजपूत यांच्याकडे रक्षाबंधनासाठी गेले.

बहिणीकडे पाहूणचार..

राखी पौर्णिमेला भाऊ आला असल्याने बहीण मीराबाई फुलसिंग राजपूत यांनी भाऊ जालमसिंग यांना राखी बांधली. त्यानंतर बहिणीकडे पाहुणचार केल्यानंतर चौधरी हे आपल्या दुचाकीने घरी येण्यास निघाले.

Accident
जळगाव जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा तीसच्या आत

दुचाकी घसरली आणि घात झाला..

दरम्यान, शेलवड - सुरवाडे मार्गे निघालेले असताना रस्त्यातच मुक्तळ- सुरवाडे दरम्यान दुचाकी घसरून पडले. त्यात त्यांच्या चेहऱ्यासमोरील बाजूस मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सुवर्णसिंग असा परिवार असून, बोदवड पोलिस ठाण्यात फिर्यादी धीरज गोविंदसिंग पाटील यांच्याफिर्यादीवरून अकस्मात मृत्यू गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस हवालदार भगवान कोळी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Who is Tukaram Mundhe?
Crime
Girna River sand mafia latest news
Maharashtra government decides to conduct 'e-Peek Pahani' through appointed assistants from July 15
Marathi News Esakal
www.esakal.com