..अन्‌ जखमीसाठी बस थेट जिल्हा रुग्णालयात

..अन्‌ जखमीसाठी बस थेट जिल्हा रुग्णालयात
bus accident
bus accidentbus accident
Updated on

जळगाव : औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर धावत्या एसटी बसचे टायर फुटून अपघात झाला. सुदैवाने प्रवासी सुखरूप असून, चालक मात्र गंभीर जखमी आहे. केबीनमध्ये पाय अडकलेल्या चालकाला बाहेर काढून दुसऱ्या बसच्या चालकाने आपल्याच बसमध्ये टाकून थेट जिल्‍हा रुग्णालयात आणले. जखमीला घेऊन बसच धडकल्याने यंत्रणेसह बघणारेही अवाक् झाले. (jalgaon-bus-accident-criver-injured-and-bus-jalgaon-civil-hospital)

bus accident
पतीचा त्रास..आणि 'वट पौर्णिमे'ला तिने स्वताःला जाळून घेतले

रावेर डेपोची औरंगाबाद- रावेर बस घेऊन चालक शेख मोहसीन शेख आरिफ (वय ३५, रा. फैजपूर ता. यावल) औरंगाबादहून सकाळी आठला रवाना झाले. सिल्लोड स्थानकातून निघाल्यानंतर काही किलोमीटरवर धावत्या बसच्या पुढचे टायर फुटल्याने चालक शेख यांचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला. खूप प्रयत्न करूनही बस नियंत्रित होत नसल्याने समेारून येणाऱ्या एका बसवर शेख यांची बस आदळली. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रवशाला दुखापत झाली नाही. परंतु समोरील वाहनाच्या धडकेमुळे बस केबिनच्या लेगरूमचा भाग ठेचला गेला त्यात बसचालक शेख मोहसीन यांचे पाय अडकून गंभीर दुखापत झाली.

सिल्‍लोड आगाराचा बसचालकाची मदत

त्याच वेळेस सिल्लोड आगारातील बसचालक एस. एस. परदेशी यांना कळताच त्यांनी तातडीने जखमीला आपल्या बसमध्ये टाकून जवळच्या दवाखान्यात नेले, प्रथमोपचार करून शेख यांना तातडीने त्यांना त्याच बसने जळगावला आणण्यात आले. एरवी जिल्हा रुग्णालयाच्या रस्त्यानेही कधी महामंडाळाची बस जाता-येता दिसत नाही, ती चक्क दारावर उभी होती. तेथूनच परदेशींनी जखमी रुग्ण असल्याचे सांगताच गेट उघडण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com