जळगाव जिल्ह्यातील मार्केट यार्ड व्यापाऱ्यांचा आज बंद

केंद्र सरकारने कडधान्य साठा मर्यादेचे धोरण मागे घ्यावे
Jalgaon Market Committees
Jalgaon Market CommitteesJalgaon Market Committees


जळगाव : केंद्र सरकारच्या (Central Government) कडधान्याबाबत आकस्मिक साठा (Cereal stocks) मर्यादा लावण्याच्या धोरणाविरुद्ध जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील (Market Committees) व्यवहार आज सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी (Radheshyam Lahoti, President, Market Yard Traders Association) व कार्याध्यक्ष अशोक राठी यांनी दिली.

(central government cereal stocks policy against closed jalgaon market committees)

Jalgaon Market Committees
आठ दिवसांपासून पाऊस बेपत्ता; दुबार पेरणीची टांगती तलवार

केंद्र सरकारने कडधान्यांवरील साठा मर्यादा अचानक लादल्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच सर्व कडधान्यांचे भाव सरकारी हमीभावापेक्षा बऱ्याच कमी दरावर टिकले आहेत. या जाचक तरतुदीमुळे दालमिल व्यवसाय धोक्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. परिणामी, धान्याची बिजवाई, पेरणी कमी होऊन भविष्यात कडधान्यांच्या भाववाढीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या कडधान्याबाबत आकस्मित साठा मर्यादा लावण्याच्या धोरणाविरुद्ध जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील व्यवहार आज बंद राहतील. केंद्र सरकारने कडधान्य साठा मर्यादेचे धोरण मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे.

...असे आहे धोरण
केंद्र सरकारच्या या धोरणामुळे होलसेल व्यापारी २०० टन अर्थात दोन हजार क्विंटल डाळींचा स्टॉक ठेवू शकेल. चिल्लर परवान्यासाठी पाच टन अर्थात ५० क्विंटल डाळींची मर्यादा निर्धारित केली आहे. दाल मिलर्सला ही मर्यादा तीन महिन्यांचे उत्पादन किंवा वार्षिक क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जी जास्त राहील, ती असणार आहे.

Jalgaon Market Committees
बीएचआर घोटाळा; कंडारेला पळवणारे अन्‌ मदतगार रडारवर

...असा होईल परिणाम
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे व्यापारी मर्यादित स्टॉक ठेवतील. मात्र, शेतकऱ्यांच्या डाळ उत्पादनाची विक्री मंदावेल आणि त्यांचेही नुकसान होईल, तर आयात खुली केल्याने व्यापारी व शेतकऱ्यांवर दुहेरी संकट येईल, असे मत जिल्हा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी व कार्याध्यक्ष अशोक राठी यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com