esakal | चाळीसगाव तालुक्यात १६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Crop Damage

चाळीसगाव तालुक्यात १६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः शहरासह जिल्ह्यात सोमवार (ता. ३०)पासून जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने ४२ गावांतील ४३ हजार ३८५ शेतकऱ्यांच्या (Farmer) पिकांचे नुकसान (Crop Damage) झाल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर (Agriculture Officer Sambhaji Thakur) यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांच्याकडे मंगळवारी (ता. ३१) सादर केला. एकूण १५ हजार ९१५ हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले.

हेही वाचा: फागणे-तरसोदचे काम सहा महिन्यांत होणार पूर्ण-नितीन गडकरी

पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला
चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार गिरीश महाजन आदींनी पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात पीकविमा न देणाऱ्या ११ बँकांवर जबाबदारी निश्‍चित


झालेले नुकसान असे
कोरडवाहू ज्वारी ः १४३ हेक्टर
बाजरी ः २५० हेक्टर
बागायती कापूस ः १२ हजार २१५
मका ः ३ हजार ५०
इतर पिके ः १००
फळपिके ः १५०
एकूण ः १५ हजार ९१५ हेक्टर

loading image
go to top