esakal | Sakal Exclusive: फागणे-तरसोदचे काम सहा महिन्यांत होणार पूर्ण-नितीन गडकरी
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Nitin Gadkari

फागणे-तरसोदचे काम सहा महिन्यांत होणार पूर्ण-नितीन गडकरी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून रखडलेले फागणे-तरसोद टप्प्यातील चौपदरीकरणाचे (Highway Fourway Work) काम सहा महिन्यांत पूर्ण होईल. त्यादृष्टीने संबंधित मक्तेदार यंत्रणेस सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Road Transport Minister Nitin Gadkari) यांनी शेअर केली. सोमवारी ‘सकाळ’ समूहातील संपादकांनी गडकरींसोबत ऑनलाइन मीटिंगद्वारे संवाद साधला. या वेळी गडकरींनी राज्यातील महामार्गाच्या प्रकल्पांसह बांबू शेती(Bamboo farming), इंधनात इथेनॉलचा वापर, जलवाहतूक व अन्य विकासात्मक बाबींच्या संदर्भात व्हिजन मांडले.

हेही वाचा: ब्रेकिंगःकोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यावर जमा होणार निधी


फागणे-तरसोदचा मुद्दा
बैठकीत उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी गुजरात-विदर्भाला जोडणाऱ्या नवापूर-अमरावती महामार्गाच्या चौपदरीकरणातील फागणे-तरसोद व चिखली-अमरावती या रखडलेल्या टप्प्यांच्या कामांचा मुद्दा उपस्थित केला. फागणे-तरसोद हा जळगाव व धुळे जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा टप्पा तीन वर्षांपासून रखडला आहे. त्या संदर्भात गडकरींनी या कामाशी संबंधित मक्तेदार एजन्सी बदलवण्यात आली आहे. नव्या कंत्राटदारास काम सोपविण्यात आले असून, आगामी सहा-आठ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्याला देण्यात आल्याचे सांगितले.


औरंगाबाद-जळगावचे काम
औरंगाबाद-जळगाव चौपदरीकरणाचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. हे कामही तीन टप्प्यांत विभागून उपकंत्राटदारांकडे देण्यात आले आहे. जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम तीन महिन्यांत पूर्ण होईल, असे गडकरींनी सांगितले. अन्य विकासात्मक प्रकल्पांबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

हेही वाचा: परिवहन मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-चित्रा वाघ


फागणे-तरसोद टप्पा दृष्टिक्षेप
एकूण अंतर : ८७.३ किलोमीटर
अपेक्षित खर्च : ९४० कोटी
कंत्राटदार : अग्रोह इन्फ्रा
आतापर्यंतचे काम : ४५ टक्के

loading image
go to top