esakal | कौटुंबिक वादातून पत्नीवर विळ्याने वार..उपचारा दरम्यान मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

कौटुंबिक वादातून पत्नीवर विळ्याने वार..उपचारा दरम्यान मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चोपडा : शहरातील फुलेनगर भागातील संजय पुंजू चव्हाण (वय ४८) याने कौटुंबिक वादातून (Family Dispute) पत्नी मीराबाई चव्हाण (वय ४०) हिच्या उजव्या पायाच्या मांडीवर विळ्याने वार (Attack) केल्याने तिला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तिला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मीराबाईचा मृत्यू (Death) झाला. ही घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

हेही वाचा: कलयुगाच्या ‘श्रावणाने’ माता-पित्याला दाखविला मंदिराचा रस्ता

संजय चव्हाण व पत्नी मीराबाई चव्हाण (दोघे रा. फुलेनगर, चोपडा) यांच्यात सतत तीन दिवसांपासून कौटुंबिक वादातून घरात कलह सुरू होता. याच पार्श्वभूमीवर रविवारी (ता. ५) सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या वादातून घरी संतापात संजय चव्हाण याने पत्नी मीराबाई चव्हाण हिच्या उजव्या पायाच्या मांडीवर विळ्याने वार करून गंभीर दुखापत केली.

हेही वाचा: लस टोचल्यानंतर वृद्ध जागीच कोसळला..!‌

मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मीराबाईला तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलगा सागर संजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण तपास करीत आहे.

loading image
go to top