esakal | कलयुगाच्या ‘श्रावणाने’ माता-पित्याला दाखविला मंदिराचा रस्ता
sakal

बोलून बातमी शोधा

Elderly parents Tempal

कलयुगाच्या ‘श्रावणाने’ माता-पित्याला दाखविला मंदिराचा रस्ता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव: संपूर्ण आयुष्य मुलांसाठी वेचत अपत्ये वाढविली, हाताच्या फोडाप्रमाणे त्यांना जपलं, वेळप्रसंगी हाताचा झोका करत त्यांना प्रेमाचा झुला दिला... परंतु त्याच कुलदीपकाने उतारवयात लाथाडल्याने वयोवृद्ध माता-पित्यास (Elderly parents) शेवटी मंदिरात (Tempal) आसरा घेण्याची वेळ आली आहे. जिल्‍हाधिकारी(Collector), जिल्‍हा पोलिस अधीक्षकांची (Superintendent of Police) प्रत्यक्ष भेट घेत तालुका पोलिसांनी तक्रारही नमूद केली. तक्रारीचा विपरीत परिणाम होऊन मुलाने घरातून बाहेर काढत कुलूप लावून घेतल्याने दोन दिवसांपासून हे दांपत्य गावमंदिरात आश्रयाला आहे.

हेही वाचा: बैलपोळा: सणासाठी बाजार गजबजला


महर्षी वाल्मीकरचीत रामायणातील श्रावणबाळाची कथा सर्वश्रृत आहे. कलियुगात मात्र पुत्राकडूनच माता- पित्यांचा अनन्वित छळ होत असल्याचा प्रकार भोकर (ता. जळगाव) येथे उघड झाला आहे. जिल्हाधिकारी, एसपींकडे दाद मागतात म्हणून मुलाने घराला कुलूप लावून दोघांना बाहेर हकलून लावले आहे. भोकर (ता. जळगाव) येथील मूळ रहिवासी रमेश सोनवणे (वय ६८) रेल्वेत कार्यरत होते. अहमदाबाद (गुजरात) येथे शेवटची नोकरी करून ते नुकतेच निवृत्त झाले. गावी शेत आणि घर असल्याने त्यांनी गावाकडे धाव घेतली. रमेश सोनवणे, पत्नी लीलाबाई यांनी निवृत्तीच्या पैशांतून टोलेजंग घर बांधले. वडिलोपार्जित जमीन ते कसत होते. मात्र, सून आणि मुलगा यांना संपूर्ण संपत्ती मिळावी यासाठी तगादा लावला होता. व्यसनाधीन मुलाचा त्रास असह्य झाल्याने त्यांनी विरोध करण्यास सुरवात केली. पण, त्यांचा विरोध तोकडा पडला.


सुनेकडून विळ्याने हल्ला
संपत्तीच्या वादातून रोजच वयोवृद्ध दांपत्यावर मुलगा व सुनेकडून अत्याचार सुरू होते. विरोध केल्यावर सूनबाईने विळ्याने हल्ला करून सासू लीलाबाई यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला.


प्रशासनाकडे दाद मागितल्याने वाद
रमेश सोनवणे, पत्नी लीलाबाई यांनी गेल्याच आठवड्यात मुलगा व सुनेच्या मारहाणीतून सुटका व्हावी, यासाठी जिल्‍हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे पाठविले. जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या सूचनेवरून प्रकरण तालुका पोलिसांत पोचले. पोलिसांनी मुलगा व सुनेला बोलावून जाबजबाब घेऊउन कर्तव्य बजावले. जिवाला धोका असताना पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखलच घेतली नसल्याचे या दांपत्याचे म्हणणे आहे.

हेही वाचा: कोरोनाकाळात शिक्षक बनले 'टेक्नोसॅव्ही'! ऑनलाइन शिक्षणाचे नवे युग


भोकर (ता. जळगाव) गावातील रमेश सोनवणे व लीलाबाई सोनवणे यांनी केलेल्या तक्रार अर्जानुसार संबंधित मुलाचे व सुनेचे जाबजबाब नोंदविले आहे. मुलाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून समज देण्यात आली आहे. मुलगा व बाप यांच्यात संपत्तीवरून वाद असल्याने मुलाने बापाला बाहेर काढल्याची माहिती आहे.
-ईश्वर लोखंडे, सहाय्यक फौजदार, चौकशी अधिकारी

loading image
go to top