esakal | चोरट्यांनी जळगाव शहरात केली हॅटट्रिक..!
sakal

बोलून बातमी शोधा

Theft

चोरट्यांनी जळगाव शहरात केली हॅटट्रिक..!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव : लॉकडाउनच्या (Lockdown relaxed) शिथिलतेने व्यापारी संकुले, मार्केट पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. शहरासह जिल्ह्यात चोरीच्या (Theft) घटनांमध्ये वाढ झाली आहे. घर, बंगले, दुकाने आणि शोरूम फोडण्याच्या घटना नित्याच्या झाल्या असून, गेल्या तीन दिवसांपासून सलग दुकाने, घरे फोडल्याच्या घटना घडत आहेत. शोरूम, घर फोडण्यात आले आहे.

हेही वाचा: चाळीसगावला पून्हा पूराचे संकट..ढगफुटी सदृष्य पाऊस

दुचाकी शोरूम फोडले; चोरटा सीसीटीव्हीत कैद

कोंबडी बाजारातील टीव्हीएस दुचाकी शोरूम मध्यरात्री चोरट्यांनी फोडून लॅपटॉप आणि मोबाईल लंपास केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. शहरातील कोंबडी बाजारातील मुख्य चौकात योगेश चौधरी (वय ४५, रा. गणपतीनगर) यांचे पंकज टीव्हीएस नावाचे दुचाकी शोरूम आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी (ता. ६) रात्री नऊला शोरूम बंद करून मालकसह कर्मचारी निघून गेले. तीनमजली इमारतीच्या गच्चीवरून चोरट्याने आत प्रवेश केला. लिफ्ट तळमजल्यावर अतसाना गच्चीवरील चायनल गेट उघडेच राहिले होते. परिणामी, चोरटा चॅनलगेटमधून लिफ्टच्या रोपद्वारे खाली आला. लिफ्टचे खालचे चॅनलगेट तोडून चोरट्याने साडेअकराला शोरूमध्ये प्रवेश मिळविला. संपूर्ण शोरूम पाहिल्यावर संशयिताने एक लोखंडी लॉकर रोकड असल्याच्या अंदाजावरून तोडले. मात्र, त्यात रोकडऐवजी लॅपटॉप व मोबाईल आढळून आला. व्यवस्थापकाच्या केबिनमध्ये शोधाशोध केली. मंगळवारी (ता. ७) सकाळी कर्मचाऱ्यांनी शोरूम उघडल्यावर त्यांना चोरी झाल्याचे आढळले. शहर पोलिसांना माहिती दिल्यावर घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा: छत्तीसगडचे हे हिल्स स्टेशन बघितले का? नाही.. तर नक्की बघा

नव्या घरात राहण्यास येण्याअगोदरच चोरी

मन्यारखेडा (ता. जळगाव) शिवारातील फातेमानगरात सय्यद सईद अली आबिद अली यांचे बंद घर फोडून रोकडसह दागिने असा ६० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. नशिराबाद पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सय्यद अली यांनी भाडे करारावरील घरातून नव्या घरात सामान टाकले होते. राहायला जाणार तोच चोरट्यांनी डल्ला मारला.
एमआयडीसीच्या मागील भागात नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत फातेमानगर येथे भाडे करारावरील खोलीत सय्यद सईद अली आबिद अली कुटुंबासह वास्तव्यास आहे. चादर- गेटम विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. राहत्या घरापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावरील ‘लेक व्हिव’ कॉलनीत सय्यद सईद अली यांनी स्वतःचे नवीन घर घेतले आहे. या घरात त्यांनी रविवारी (ता. ५) जुन्या घरातील सामान स्थलांतरित केले. त्यानंतर घर बंद करून पूर्वी राहत असलेल्या घरात झोपायला निघून गेले. मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी कपाटातील दागिने, पाच हजार रोख असा एकूण ६० हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. सोमवारी सईद अली, आई शकिला बी यांच्यासह नवीन घरी सामान घेण्यासाठी गेल्यावर कुलूप तुटलेले आढळले, तर घराचा दरवाजा उघडा होता. आतील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरीची खात्री झाल्यावर सय्यद सई अली यांनी नशिराबाद पोलिसांना घटना कळविली.

loading image
go to top