esakal | छत्तीसगडचे हे हिल्स स्टेशन बघितले का? नाही.. तर नक्की बघा
sakal

बोलून बातमी शोधा

Chhattisgarh Hills Station

छत्तीसगडचे हे हिल्स स्टेशन बघितले का? नाही.. तर नक्की बघा

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगावः भारत (India) हा नैसर्गिक संपन्न असा देश असून अनेक राज्यात अनेक पर्यटन स्थळ असून येथे कायम पर्यटकांची मंदीयाळी असते. असेच छत्तीसगड (Chhattisgarh) हे राज्य उत्तम पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध आहे. भरपूर जंगल या राज्यात असून दुर्मिळ डोंगर, धबधबे आणि वन्यजीव पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. याशिवाय छत्तीसगड मध्ये प्राचीन मंदिरे आणि स्मारक देखील आहे. चला तर छत्तीसगडमधील जाणून घेवू हिल स्टेशनविषयी (Hill station)..

Mainpat Hills Station

Mainpat Hills Station

मेनपाट हिल्स स्टेशन

छत्तीसगड राज्यात मेनपाट हिल स्टेशन हे 'मिनी तिबेट' म्हणून ओळखले जाते. बर्‍याच नद्या व घनदाट जंगलाने हा परिस वेढलेला असून येथे कुटुंबासोबत भेट देण्याचे उत्तम ठिकाण आहे. येथे ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच स्थानिक आणि तिबेटियन संस्कृती आणि विविध परंपरा तुम्ही पाहू शकतात.

Chirimiri Hills Station

Chirimiri Hills Station

चिरमिरी हिल स्टेशन

छत्तीसगड मध्ये कोरिया जिल्ह्या असून त्यात चिरमिरा हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. याला छत्तीसगडचा स्वर्ग देखील म्हणतात. येथे हिरवळ, पर्वत आणि नद्याचे ठिकाणे भरपुर आहे. समुद्रसपाटीपासून पाचशे मीटरपेक्षा जास्त उंचीवर हे स्थळ असून हे स्थान कोळसा खाणींसाठी देखील प्रसिद्ध आहे.

Ambikapur Hills Station

Ambikapur Hills Station

अंबिकापूर हिल्स स्टेशन

डोंगराळ भागांतील अंबिकापूर हे हिल स्टेशन असून येथे दाट जंगल उंच टोकदार टेकड्या आहेत. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य अधिक खुलते हे ठिकाण पर्यटकांसाठी आवडीचे ठिकाण आहे. येथे ट्रेकिंग आणि रॉक क्लाइंबिंगचा देखील आनंद घेता येतो. तसेच तमोर पिंगला अभयारण्य अंबिकापुरात देखील आहे जिथे आपण फिरायला जाऊ शकता.

हेही वाचा: अजब-गजब तलाव पाहिलाय? जंगल दिसतं उलटे

फिरण्यासाठी अन्य काही स्टेशन ठिकाण..

छत्तीसगड राज्यातील तीन हिल स्टेशनशिवाय बरीच विस्मयकारक ठिकाणे आहेत. त्यात भिल्लई, मल्हारचे ऐतिहासिक शहर, चित्रकूट धबधबे, अचनकमार व्याघ्र प्रकल्प, कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान आणि कोतूसमर लेणी यासारख्या नैसर्गिक स्थळांनाही कौटुंबिक सहल भेट देता येईल.

loading image
go to top