जळगावकरांना डेंगी, चिकूनगुनियाचा विळखा

जिल्हा रुग्णालयातही २० ते २५ रुग्ण या आजाराचे रोज नव्याने आढळत आहेत.
Mosquito
Mosquito


जळगाव ः कोरोनोच्या दुसऱ्या (Corona 2nd Wave) लाटेतून जळगावकर सावरत असतानाच आता डेंगी(Dengue), चिकूनगुनिया, मलेरियाने शहरात पाय पसरले आहेत. नुकताच पावसाचा जोर ओसरला आहे. नद्या, नाले, तलाव, विहिरीत चांगला साठा आहे. शहरात अनेक ठिकाणी लहान डबकी, तळे, घराजवळ तसेच घराच्या छतावर असलेल्या निरुपयोगी साहित्यांमध्ये पाणी साचून त्यात डासांची (Mosquito)अंडी साचली आहेत.

Mosquito
जळगावात ५६ हजारांवर मूर्तींचे विसर्जन



खासगी रुग्णालयात रोज सरासरी किमान पाच संशयित रुग्णांच्या रक्त तपासणीत मलेरिया, डेंगी आढळत आहे. सोबतच जिल्हा रुग्णालयातही २० ते २५ रुग्ण या आजाराचे रोज नव्याने आढळत आहेत. शहरातील अनेक रुग्णालयांत सकाळी व रात्री उशिरापर्यंत तपासणीसाठी रुग्णांच्या रांगा लागलेल्या आढळून येत आहेत. लहान मुलांच्या रुग्णालयातही अनेक मुले याच व्याधीने ग्रस्त आहेत. ताप येताच डॉक्टर रुग्णांना रक्त तपासणीचा सल्ला देतात. यामुळे शहरातील सर्वच रक्त, लघवी तपासण्या केंद्रावर नेहमी गर्दी पाहावयास मिळत आहे. डेंगीच्या तब्बल सोळा हजारांपेक्षा अधिक अळ्या गेल्या महिन्यात आढळल्या होत्या. त्यानंतर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक डबक्यांमध्ये, गवतावर डासांची उत्पत्ती झाली होती.

.
कशामुळे होते डेंगी
हा संसर्गजन्य आजार असून, तो डासांच्या चावण्यामुळे होतो. एडिस इजिप्टस या डासांच्या चावण्यामुळे हा आजार होतो. तोच डास जर दुसऱ्या कोणाला चावला, तर त्यालादेखील डेंगी होण्याची शक्यता असते. हे डास एक फुटापेक्षा जास्त वर उडत नाहीत. त्यामुळे असे डास अनेकदा पायांना चावतात. या डासांच्या पाच ते सहा वेळा चावल्यामुळे डेंगीची शक्यता असते. यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या कमी होऊ लागते. झपाट्याने ही संख्या कमी झाली तर एखादा अवयवही निकामी होऊ शकतो.

Mosquito
आघाडी सरकारचे विर्सजन व्हावे हे जनतेच्या मनातील इच्छा-गिरीश महाजन

अशी आहेत लक्षणे
खूप ताप येणे, डोळे जळजळणे, अंगदुखी, कंटाळा येणे, उलट्या होणे, त्वचेवर लाल चट्टे येणे, डोकेदुखी, भूक न लागणे, पांढऱ्या पेशींची संख्या कमी होणे, पोट फुगणे


चिकूनगुनियाची लक्षणे
चिकूनगुनियाचे सर्वांत प्रमुख लक्षण ताप आहे. चिकूनगुनिया तापाची लक्षणे सामान्य तापाच्या लक्षणांपासून भिन्न असतात. याव्यतिरिक्त, मळमळ, पुरळ, डोकेदुखी, थकवादेखील सामान्य लक्षणे आहेत. चिकूनगुनियासाठी कोणताही उपचार किंवा विशिष्ट उपचार नाही, या रोगाच्या विषाणूचीही लस नाही. आपण फक्त लक्षणे व्यवस्थापित करू शकतो.

Mosquito
३ कोटी ७५ लाख वेतन निधीचा मार्ग झाला मोकळा..!

सध्या डेंगी, चिकूनगुनिया या व्याधींचे रुग्ण सर्वत्र वाढलेले दिसून येतात. अतिवृष्टीमुळे डबक्यात साचलेल्या डासांमुळे ही व्याधी होते. डासांपासून आपला बचाव हाच चांगला उपाय आहे. रुग्णांनी ताप येताच डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्ताची तपासणी करावी.

डॉ. रितेश पाटील, जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com