रात्रभर जळगाव शहर चोरट्यांच्या ताब्यात..; लॉकडाउननंतर चोरटेच ‘अनलॉक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

medical store robbery

रात्रभर जळगाव शहर चोरट्यांच्या ताब्यात..; लॉकडाउननंतर चोरटेच ‘अनलॉक’

जळगाव : गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाउनमुळे बंद असलेले जळगाव शहर पूर्वपदावर येत असताना रात्रभर चोरट्यांनी जळगाव शहर जणू आपल्या ताब्यात घेत पहाटेपर्यंत धुमाकूळ घातला. चार वेगवेगळ्या ठिकाणांहून मोटारसायकली चोरल्या, त्यावर शहराची रात्रभर रपेट मारत रहिवासी वस्त्यांमध्ये घराबाहेर उभ्या कार चोरून नेल्या. मेहरूणमध्ये एका उपनिरीक्षकाच्या कारचोरीचाही प्रयत्न झाला. (jalgaon-city-night-three-medical-and-other-spot-robbery)

वेगवेगळ्या ठाण्यांच्या हद्दीत चोरीसह दुकाने फोडल्याचे गुन्हे दाखल आहेत. शनिवारची रात्री चोरट्यांनी शहरात ठिकठिकाणी अक्षरश: धुमाकूळ घातला.

दुचाकींची चोरी

झाकिर हुसेन कॉलनी, गणेशपुरी मेहरूण भागातून उपनिरीक्षक मुन्सफ पठाण यांच्या घरासमोरून शेजाऱ्यांची होंडा पॅशन प्रो (एमएच १९, डीएफ ४१०४), सिंधी कॉलनीतील रहिवासी राजकुमार शंकरलाल नाथाणी यांच्या मालकीची पॅशन प्रो (एमएच १९, ४०५६), राजेंद्र नारायण चौधरी यांच्या मालकीची स्प्लेंडर (एमएच १९, बीटी २५८८), रेमंड वस्त्रोद्योगच्या बाहेरून बजाज सीटी-१०० (एमएच १९, एजे ३४९९) अशा चार मोटारसायकली शहरात दाखल झालेल्या चोरट्यांच्या टोळीने वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरल्या. याच वाहनांवर शहरभर फिरत मोठ्या गुन्ह्यांसाठी चांगली चारचाकी वाहने शोधण्यात आली. विविध वस्त्यांमध्ये घराबाहेर उभ्या पाचपैकी तीन कार चोरून नेण्यात चोरटे यशस्वी ठरले.

हेही वाचा: सीईओ शिवीगाळ प्रकरणी माजी आमदारांना दिलासा

तीन कार लंपास

युनूस युसूफ मुजावर यांच्या सालारनगर येथील रहिवासी सुनूस युसूफ मुजावर यांच्या मालकीची तवेरा (एमएच २०, सीएच ८७८६) ही कार घराबाहेरून चोरट्यांनी नेल्याचे उघडकीस आल्यावर औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात मुजावर यांनी तक्रार दाखल केली. रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत टेलिफोननगरातील स्कॉर्फिओ (एमएच ०४, केबी ०९५७) ही कार चोरीस गेली. त्यानंतर शहरातील मेहरूण भागातूनच घराबाहेर उभी सॅन्ट्रो कार (एमएच ०२, एमए ४०१७) चोरीला गेली आहे.

फौजदाराची कार वाचली

जळगाव शहरातील मेहरूण येथील गणेशपुरी येथील रहिवासी पोलिस उपनिरीक्षकाच्या मालकीच्या घराबाहेर उभ्या कारच्या दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी आतील इग्नेशन लॉक सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बरेच प्रयत्न करूनही कार सुरू झाली नाही.

हेही वाचा: अ‘सहकार’ करणाऱ्या गद्दारांना धडा शिकवू : सहकार गटनेते उदय पाटील

रिक्षातून आले चोरटे

शहरातील मेहरूण भागातील महादेव मंदिराजवळ रात्री साडेतीनच्या सुमारास ऑटोरिक्षा (एमएच १९, व्ही ६४२४) घेऊन चार चोरटे मेहरूण परिसरात शिरले. मात्र येथे एका ग्रामस्थाने हटकल्याने त्यांना पळून जावे लागले, तर रेमंड कर्मचारी बारी यांनीही अशाच प्रकारे वाहन चोरट्यांना हुसकवून लावले.

तीन मेडिकल फोडली

आकाशवाणी चौकातील एकाच रांगेतील ॲपेक्स मेडिकल, विनोद मेडिकल आणि विवेकानंद नेत्रालय अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकडसह किरकोळ वस्तू लंपास केल्याचे उघडकीस आले. तवेरा कारसह चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. आकाशवाणी चौकातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ॲपेक्स हॉस्पिटलमधील मेडिकल दुकानाजवळ २० जूनला पहाटे चारच्या सुमारास मध्यरात्री तवेरा कारमध्ये अज्ञात तिघे आले.

Web Title: Marathi News Jalgaon City Night Three Medical And Other Spot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..