esakal | जळगावच्या रस्त्यांवर चिखलाची ‘रांगोळी’; नागरिकांचे प्रचंड हाल!
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Pits in road

जळगावच्या रस्त्यांवर चिखलाची ‘रांगोळी’; नागरिकांचे प्रचंड हाल!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे (Rain) जनजीवन विस्कळित झाले असताना, शहरातील रस्ते, त्यातील खड्डे, अमृत योजनेच्या (Amrut scheme) रखडलेल्या कामामुळे ठिकठिकाणच्या चाऱ्या, त्यात साचलेले पाणी या भयानक परिस्थितीमुळे जळगावकरांचा चांगलाच संताप होत आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर चिखलाने ‘रांगोळी’ रेखाटल्याचे विदारक चित्र (Pits in the road) तयार झालंय. जूनमध्ये पाठ फिरवल्यानंतर जुलैत तरी चांगल्या पावसाची अपेक्षा होती. परंतु, राज्यात इतरत्र चांगला पाऊस होत असताना जळगाव जिल्ह्यात मात्र पावसाची प्रतीक्षा होती, ती आजही कायम आहे. परंतु, दोन दिवसांपासून शहरात तुरळक पाऊस होत आहे.

(jalgaon city rodes pits plague all citizens suffer)पावसाने दुरवस्था उघड
बुधवारी पहाटेपासूनच जळगाव शहरात संततधारेने हजेरी लावली. सकाळी सहापासून दहापर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसत होता. एरवी पाऊस नसतानाही रस्त्यांची दुरवस्था हे चित्र जळगावकरांना नवीन नाही. मात्र, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची प्रचंड बिकट अवस्था झाली असून, त्यामुळे वाहनधारक, पादचारी सर्वच त्रस्त आहेत.

संपूर्ण शहरच खड्ड्यात
एकतर शहरात तीन वर्षांपासून ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा जलवाहिनी व भुयारी गटारांचे काम सुरू आहे. जलवाहिन्यांसाठी रस्त्याच्या एका बाजूने, भुयारी गटार योजनेसाठी रस्त्याच्या मधोमध चाऱ्या खोदल्या जात आहेत. खोदलेल्या चाऱ्या, खड्डे व्यवस्थित बुजविलेही गेलेले नाहीत. ज्या ठिकाणी पॅचवर्क झाले, तेथील खडी उखडून गेली. ज्याठिकाणी पॅचवर्कच झाले नाही, तेथे माती-मुरूम रस्त्यावर येऊन चिखल झाला. नळसंयोजनासाठी दिलेले खड्डे कसेबसे बुजविल्याने पावसामुळे ते उघडे पडले.

हेही वाचा: अंगावरची हळद फिटत नाही तोच..नवविवाहितेने उचले कठोर पाऊल

भुयारी गटारांचेही तसेच
भुयारी गटार योजनेसाठी ज्या चाऱ्या करण्यात आल्या, त्यांची अवस्थाही तशीच आहे. या गटारांसाठी ठिकठिकाणी चेंबर टाकले असून, ते रस्त्याच्या लेव्हलपेक्षा उंच आहेत. त्यामुळे या दोन्ही चाऱ्यांमुळे सर्वच रस्त्यांची दोन्ही बाजूंनी दुरवस्था झाली आहे. चारचाकी चालवणे तर दूरच दुचाकीही व्यवस्थित चालवता येणार नाही, अशी जवळपास सर्वच रस्त्यांची अवस्था आहे.

जळगावकर चिखलाचे साक्षीदार
अमृत योजनेच्या रखडलेल्या कामामुळे नरक यातना भोगणाऱ्या जळगावकरांना पावसामुळे झालेल्या चिखलाचे साक्षीदार व्हावे लागत आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर चिखलाने रांगोळ्या साकारल्या आहेत. एकही रस्ता सुस्थितीत नाही. त्यामुळे रस्त्यांच्या खड्ड्यात पडून, चिखलात घसरून वाहनांचे अपघात होत असून, हे रस्ते, खड्डे नागरिकांच्या जिवावर उठले आहेत.

हेही वाचा: शहादा विभागात वन विभाग ९७ हजार वृक्षारोपण करणार


सत्ताबदलही निरुपयोगी
सप्टेंबर २०१८ मध्ये महापालिका निवडणूक होऊन भाजपची सत्ता आली. सत्तांतरामुळे मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, जळगाव शहर खड्ड्यातच राहिले. अडीच वर्षे भाजपच्या कारभारावर टीका करणाऱ्या शिवसेनेने गेल्या मार्चमध्ये चमत्कार घडवून सत्ता काबीज केली. त्यालाही पाच महिने झाले, पण आजही शहर खड्ड्यातच आहे. उलट शहराची आणखीच दुरवस्था झालीय. म्हणजे या दोन्ही वेळी झालेला सत्ताबदल जळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने निरुपयोगी ठरलाय.

loading image