पतीचा अपघात,वडील आजारी त्यात महिलेच्या नशिबी तिसरे संकट

मुलगा धवल घरी आल्यावर चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. तत्काळ त्याने आईसह नातेवाइकांना घटना कळवून शनिपेठ पोलिसांना पाचारण केले.
 Theft
Theft

जळगाव : योगेश्‍वरनगरातील भोळे कुटुंबीयांचे बंद घर फोडून चोरट्यांनी (Thieves) दागिन्यांसह ७५ हजार ५०० रुपयांची रोकड असा २ लाख ४४ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केला. तक्रारदार काजल भोळे यांच्या पतीचा अपघात झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर, वडील आजारी असल्याने त्यांच्या देखभालीसाठी गेलेल्या असताना चोरट्यांनी घरफोडी केली. शनिपेठ पोलिसांत (Shanipeth Police) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 Theft
पाण्याचे येणारे संकट ओळखून एकवटले शेतकरी; नदीपात्रात नांगरटी सुरू


जुना नशिराबाद रोडवरील योगेश्‍वरनगरात काजल भोळे (वय ३५) या पती विकास भोळे व मुलांसह वास्तव्यास आहेत. काजल भोळे यांचे पती विकास भोळे यांचा अपघात झाल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. तर, प्रेमचंदनगरात त्यांचे माहेर असून वयोवृद्ध वडील आजारी आहेत. अशा परिस्थिती काजल या वडिलांच्या देखभालीसाठी प्रेमचंदनगरातील घरी मुक्कामी असतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी (ता. १७ ) त्या योगेश्‍वरनगरातील घर बंद करुन दोन्ही मुलांसह वडिलांकडे मुक्कामी आल्या. त्याच रात्री चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. स्वयंपाक घरापासून ते बाथरूमपर्यंत एकूण एक वस्तूंची उलथापालथ करून चोरट्यांनी १ लाख ६८ हजार ६०० रुपयांचे दागिने व ७५ हजार ५०० रुपयांची रोकड असा २ लाख ४४ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी (ता. १८) काजल भोळे यांचा मुलगा धवल घरी आल्यावर चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. तत्काळ त्याने आईसह नातेवाइकांना घटना कळवून शनिपेठ पोलिसांना पाचारण केले. उपनिरीक्षक यशोदा कणसे, परिष जाधव, किरण वानखेडे अशांच्या पथकाने पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा केला. काजल भोळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरिक्षक यशोदा कणसे करीत आहेत.

 Theft
माफ करा..पण आम्ही घरात बसून काम करू शकत नाही-राज्यमंत्री डॉ. पवार


अगोदर पोटपूजा नंतर काम दुजा...
चोरट्यांनी घरात शिरल्यावर अगोदर फ्रिजमधील खाण्याचे साहित्य शोधले, नंतर स्वयंपाक घरातील डबे शोधून काढले. घरातील काजू-बदामसह खाण्याचे जे काही साहित्य मिळाले त्यावर यथेच्छ ताव मारत नंतर घर झडती घेत त्यांनी रोकडसह दागिने लंपास केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com