पाण्याचे येणारे संकट ओळखून एकवटले शेतकरी; नदीपात्रात नांगरटी सुरू

पुरेसा पाऊस पडत नसल्याने बारमाही वाहणाऱ्या नद्या काही काळापुरतेच वाकड लागले आहे त्यामुळे सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे.
Plow
Plow
Summary

मिनीत पाण्याची पातळी वाढावी यासाठी गोमाई नदीपात्रात नदी नांगरटीचा प्रयोग सर्वप्रथम २००० साली वनश्री मोतीलाल तात्या पाटील यांनी स्वखर्चाने डामरखेडा परिसरात केला.

शहादा : भविष्यातील पाण्याचे दुर्भिक्ष (Water Crisis) ओळखून धुरखेडा (ता. शहादा) येथील शेतकऱ्यांनी (Farmer) एकत्र येत स्वखर्चाने गावालगत असलेल्या गोमाई नदी (Gomai Rivher) पात्र २१ ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरटी करुन जमिनीत पाणी पातळी (Increase in water level) वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Plow
संततधारेनंतरही धुळे शहरातील नकाणे तलाव निम्माच

गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या समतोल ढासळल्याने अवेळी, पुरेसा पाऊस पडत नसल्याने बारमाही वाहणाऱ्या नद्या काही काळापुरतेच वाकड लागले आहे त्यामुळे सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. जमिनीत पाण्याची पातळी वाढावी यासाठी गोमाई नदीपात्रात नदी नांगरटीचा प्रयोग सर्वप्रथम २००० साली वनश्री मोतीलाल तात्या पाटील यांनी स्वखर्चाने डामरखेडा परिसरात केला.त्यामुळे परिसरातील अनेक विहिरी व कूपनलिकांना पाणी आले. नदी नांगरल्यामुळे नदीत असलेले खडी, मुरूम, खडकाळ जागा नरम झाल्यामुळे पावसात आलेलं पाणी नागरटी केलेल्या भागात जिरल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली. या उपक्रमाची तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन नदी नागरटी प्रकल्प याची विस्तृत माहिती घेऊन राज्यात हा उपक्रम सुरू केला होता.

Plow
मघा नक्षत्रात गाढवाने भार उचलला

आणि शेतकरी एकत्र आले..

दोन वर्षापासून अल्प प्रमाणात पाऊस होत आहे. या वर्षी तर निम्मे पावसाळा निघून गेल्यानंतर देखील सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी, शेतमजूर हवालदिल झालेले आहेत. सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे. ऑगस्ट महिना येऊन देखील पुरेश्या पावसाअभावी नदी कोरडी आहे. येणाऱ्या दिवसात भीषण पाणीटंचाई निर्माण होउ नये यासाठी धुरखेडा गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गोमाई नदी पात्रात ट्रॅक्टर टाकून नांगरटी चा उपक्रम सुरु केला. या अभियानाची सुरुवात शहादा तालुका कृषी अधिकारी किशोर हाडपे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.

Plow
सातबाऱ्यावरील कालबाह्य "बोझ्यांच"ओझं उतरणार


२१ ट्रॅक्टरद्वारे नांगरटी....
गोमाई नदीपात्रात सुमारे २१ ट्रॅक्टरद्वारे नदी नांगरटी उपक्रम ग्रामस्थांनी सुरू केला आहे.यात नदी पात्रात सुमारे दीड ते दोन फूट खोल नांगरटी करण्यात आली आहे .नदी नांगरटी करिता ट्रॅक्टर मालक स्वतः व ग्रामस्थांनी डिझेल खर्च करून हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमामुळे धुरखेडा ,लांबोळा, करजई ,बुपकरी ,डामरखेडा, भादा , प्रकाशा यासह परिसरातील शेकडो एकर जमिनी तील कूपनलिका ,विंधन विहिरींना पाण्याच्या समस्या भविष्यात सुटणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com