esakal | घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने जळगाव मनपाला फटका 
sakal

बोलून बातमी शोधा

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने जळगाव मनपाला फटका 

गेल्या वर्षी जळगाव महापालिका ७६ व्या स्थानी होती. नंतर महापालिकेने स्वच्छतेसोबत संकलन झालेला ओला- सुका कचरा वर्गीकरण सुरू केल्याने यंदा ६४ व्या क्रमांकावर स्थान महापालिकेने मिळविले आहे. 

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्याने जळगाव मनपाला फटका 

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव  : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्य आणि केंद्राच्या समितीने डिसेंबर २०१९ व २०२० मध्ये पाहणी केली होती. अभियानात सर्वेक्षण केलेल्या ३८२ शहरांचा समावेश आहे. त्यासंदर्भातील निकाल जाहीर झाला असून, यात जळगाव महापालिकेचा देशातून ६४ व्या, तर राज्यातील ३३ महापालिकांमधून २० वे स्थान मिळविले आहे. हा अहवाल शहरातील अस्वच्छतेच्या स्थितीवर शिक्कामोर्तब करणारा असल्याचे बोलले जात आहे. 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाने स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविले होते. या अभियानात ३८२ शहरात समावेश असून, जळगाव शहराने सहभाग घेतला होता. या अभियानांतर्गत जळगाव महापालिकेतर्फे शहरात उपायोजना सुरू केल्यानुसार गेल्या वर्षी जळगाव महापालिका ७६ व्या स्थानी होती. नंतर महापालिकेने स्वच्छतेसोबत संकलन झालेला ओला- सुका कचरा वर्गीकरण सुरू केल्याने यंदा ६४ व्या क्रमांकावर स्थान महापालिकेने मिळविले आहे. 

घनकचरा प्रकल्पाची उणीव 
राज्य आणि केंद्रीय समितीने डिसेंबर २०१९, जानेवारी २०२० मध्ये स्वच्छ सर्वेक्षणाबाबत पाहणी केली होती. शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन नागरिकांचा अभिप्राय, ओला- सुका कचरा वर्गीकरण, प्लॅस्टिकबंदी, डोअर टू डोअर कचरा संकलन, कागदपत्रांची पूर्तता आणि घनकचरा प्रक्रिया प्रकल्प आहे का, याची तपासणी केली होती. सर्वेक्षणप्रसंगी शहरात घनकचरा प्रक्रिया प्रकल्प नसल्यामुळे गुण कमी मिळाल्याने महापालिकेचे स्थान घसरले आहे. 

...तर रँक सुधारली असती 
जळगाव शहरातील दैनंदिन स्वच्छता व कचरा संकलनाचा मक्ता महापालिकेने वॉटरग्रेस कंपनीला दिला. सहा महिन्यांत मक्तेदाराने कामबंद केल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेने दुसऱ्या मक्तेदाराकडून स्वच्छतेचे काम सुरू केले. त्याच वेळी स्वच्छ सर्वेक्षणाची समितीने पाहणी केली. वॉटर ग्रेसचे काम चांगले असते तर तसेच काम सुरू असते तर सर्वेक्षणात अजून गुण चांगले मिळून स्थानात सुधारणा झाली असती. 

स्वच्छ सर्वेक्षणात जळगाव महापालिकेने गतवर्षाच्या तुलनेत रँकिंग सुधारले असले, तरी हा निकाल समाधानकारक नाही. स्वच्छतेबाबत आणखी सुधारणा करण्यात येतील. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू असून, महापालिकेचे रँकिंग निश्‍चितपणे सुधारण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. 
-भारती सोनवणे, महापौर, जळगाव 

loading image
go to top