
ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस जिल्ह्यात झाला. केळी उत्पादक शेतकरी केळीचे रोपे लावली असताना सततच्या पावसाने रोपांवर ‘सीएमव्ही’ रोग आला. हा रोग आला, की केळीचे दोन ते तीन फुटाचे झाड उपटूनच फेकावे लागले.
जळगाव : गेल्या महिन्यात जिल्ह्यात अतीपावसाने केळी रोपांवर ‘सीएमव्ही’ रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. जिल्ह्यात ‘सीएमव्ही’ रोगाच्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही सुरू आहेत. रोप दोन फुटाचीच असताना असा रोग आला, तर केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी उपटून फेकावीच लागते. या रोगाबाबत प्राथमिक अंदाजानुसार २७१४ हेक्टर केळीचे क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ५४ कोटींवर आर्थिक नुकसान झाले असून, २९२० शेतकऱ्यांना याचा फटका बसला. ‘सकाळ’ने याबाबत वारंवार पाठपुरावा केल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत.
ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस जिल्ह्यात झाला. केळी उत्पादक शेतकरी केळीचे रोपे लावली असताना सततच्या पावसाने रोपांवर ‘सीएमव्ही’ रोग आला. हा रोग आला, की केळीचे दोन ते तीन फुटाचे झाड उपटूनच फेकावे लागले. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ‘सकाळ’ने वृत्त देत जिल्हा प्रशासनासह कृषी विभागाला पंचनामे करण्यासाठी बाध्य केले होते. यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केळीवरील रेागामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पंचनामे करण्यास सुरवात झाली असून, प्राथमिक अहवालानुसार ५० कोटींच्या वर आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर एकत्रित नुकसानीची तीव्रता कळणार आहे.
सर्वाधिक नुकसान भडगावला
सीएमव्ही रोगाचा सर्वाधिक फटका हा भडगाव तालुक्याला बसला असून, तेथील नुकसान ७८ टक्क्यांवर आहे. त्यात ७७५ शेतकऱ्यांचे ६८२ हेक्टरवर नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यात ८ टक्के, तर जामनेर ९, भुसावळ १४, बोदवड ४, मुक्ताईनगरला १ टक्के नुकसान झाले आहे.
तालुकानिहाय झालेले नुकसान
तालुका--लागवड क्षेत्र--गावांची संख्या--नुकसानग्रस्त शेतकरी-..बाधीत क्षेत्र (हे.)
जळगाव-१४६१--१--१५--६--
भुसावळ--४७६-११-९९-६६-
बोदवड--४७--१-२-२-
यावल--७३२९--१-१--१.२०--
रावेर--२१०१८--४५--१८३६--१७५१
मुक्ताईनगर--६१८५--५--४२--६३
जामनेर--५५०--७६-६८--५१
पाचोरा--८२९-२२-७५--८२
भडगाव--८६९--२१--७७५--६८२
एकूण--४४०७८--१८८--२९२०--२७१४
संपादन ः राजेश सोनवणे