esakal | खचू नका..सरकार शेतकऱ्यांसोबत-दादा भुसे
sakal

बोलून बातमी शोधा

Dada Bhuse

खचू नका..सरकार शेतकऱ्यांसोबत-दादा भुसे

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर : धुळे जिल्ह्यासह राज्यात अनेक भागात अद्यापही पुरेसा पाऊस (Rain) नाही. काही ठिकाणी शेतीची (Farm) पहाणी केली असता दोन चार दिवसात पाऊस न आल्यास पिके (Crop) शेतकऱ्यांच्या (Farmers) हाती येण्याची शक्यता कमी आहे. पाऊस पडावा म्हणून आराधना सुरू आहेच. दुर्दैवाने दुष्काळी परिस्थिती उद्भवली तरी खचून जावू नका. राज्यातील सरकार शेतकऱ्यांसोबत (State Government) आहे. आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असा विश्वास देण्यासाठी आलो आहे. असे आश्वासन कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी केले.

(state government is with the farmers said minister dada bhuse)

हेही वाचा: वाळूमाफियांविरोधात चार गावांचा ‘एल्गार’!


सोंडले ता. शिंदखेडा येथे शनिवारी (ता. 10) शेतकरी आढावा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी कृषीमंत्री भुसे बोलत होते. जिल्हाधिकारी संजय यादव, शिरपूरचे प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार सुनील सैंदाणे, सरपंच मंगलबाई पवार, कृषी अधिकारी जी. के. चौधरी, पी. एम. सोनवणे, आत्मा चे प्रकल्प उपसंचालक एस. डी. मालपुरे, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: कृषी कंपन्यांना निधी वितरणाबाबत राज्य शासनाची दुटप्पी भूमिका


खरीप हंगामासाठी राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्याची माहिती कृषी मंत्री भुसेंनी दिली. ते म्हणाले शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी रिसोर्स बॅंक तयार केली असून यदाकदाचित लवकर पाऊस न झाल्यास कमी पावसात व दिवसात येणारे पिके, खते, बि बियाणे आदींची उपलब्धता झाली असून अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्ज मिळेल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे अनुदान मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने कालबध्द विशेष अभियान राबवावे. एमआरईजीएस योजनेंतर्गत राज्यात 38 हजार हेक्टर क्षेत्रात फळबाग लागवड करण्यात आली आहे. या वर्षी 60 हजार हेक्टर क्षेत्राचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे वळावे. सेंद्रीय शेतीचे मानांकन, प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. त्याची कार्यवाही सुरू असून लवकरच अंमलबजवाणी करण्यात येईल. शेतकरी उत्पादक कंपनी, गटशेती, प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने कार्यवाही करावी. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. या योजनेचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरू!


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेंतर्गत निर्धारित उद्दिष्टाची पूर्तता करावी. या योजनेंतर्गत रोपवाटिका कार्यान्वित कराव्यात. शेतकऱ्यांना पीक कर्जाचा वेळेत पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमितपणे आढावा घ्यावा, असेही निर्देश कृषी मंत्री श्री. भुसे यांनी दिले. यावेळी उत्पादन बाबतीत स्पर्धेत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक विजेते सुमनबाई दुर्योधन देवरे, रा मुडावद, जिल्हा स्थरीय प्रथम शरद प्रकाश पवार, रा. पडावद, तालुका स्थरीय प्रथम ज्ञानेश्वर भिका पाटील रा. पडावद, कृषी भुषण वाल्मीक आनंदा पाटील रा. चांदे
यांचा कृषीमंत्री भुसेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच कृषी प्रक्रिया आधारित उद्योग आणि पूरक व्यवसाय सुरू करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी यादव यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले.

loading image