esakal | राज्यातील विद्यापीठ कॅम्पसमध्ये ‘तंबाखू, छेडछाडमुक्त’ अभियान

बोलून बातमी शोधा

Min-Uday-Samant
राज्यातील विद्यापीठ कॅम्पसमध्ये ‘तंबाखू, छेडछाडमुक्त’ अभियान
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : उमवितील तक्रार निवारण केंद्राच्या धर्तीवर राज्यातील अन्य विद्यापीठांमध्ये हे मॉड्यूल राबविण्यासह लवकरच विद्यापीठांचे (KBC North Maharashtra University) कॅम्पस ‘तंबाखू व छेडछाडमुक्त’ करण्याची मोहीम हाती घेतली जाईल, असा मानस राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी व्यक्त केला. (convocation ceremony kbc north maharashtra university tobacco tamper free campaign)

हेही वाचा: महामार्ग चौपदरीकरणाचे कोरोनामुळे यंत्रणा ‘लॉक’, काम ‘डाउन’ !

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २९व्या दीक्षान्त सोहळ्यात प्रमुख पाहणे म्हणून ते बोलत होते. ऑनलाइन पद्धतीने हा सोहळा झाला. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्‍यारी (Governor Bhagat Singh Koshari) अध्यक्षस्थानी होते.

हेही वाचा: राज्याची राजधानी "ना"पास..सातारा आघाडीवर

श्री. सामंत म्हणाले, कोविडमुळे शिक्षणात काही व्यत्यय निर्माण झाले. मात्र सर्व विद्यापीठांनी अत्यंत पारदर्शकपणे ऑनलाइन परीक्षा यशस्वीपणे घेतल्या. या वर्षीच्या इतरही परीक्षा विद्यार्थ्यांची सुरक्षा बघून विद्यापीठांनी यशस्वीपणे ऑनलाइन पद्धतीने पार पाडाव्यात, अशी पेक्षा त्यांनी व्यक्त केली.

(convocation ceremony kbc north maharashtra university tobacco tamper free campaign)